S. Jaishankar: जगभरात ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्याचा धोका

UNSC च्या काऊंटर टेररिझम समितीच्या बैठकीचा दुसरा दिवस; दहशतवाद्यांकडून प्रोपगंडासाठी इंटरनेटचा वापर
S. Jaishankar
S. JaishankarDainik Gomantak

S Jaishankar: जगभरात ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ले होण्याची भीती भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केली. या तंत्रज्ञानाचा खर्च खूप कमी आहे आणि ते सहजरित्या उपलब्ध होऊ शकते, असे कारणही त्यांनी सांगितले. राजधानी दिल्लीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) च्या दहशतवादविरोधी समितीची बैठक सुरू आहे. शनिवारी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.

S. Jaishankar
Twitter's Indian Head: ट्विटरचे नेतृत्व करणाऱ्या 'या' भारतीयांविषयी माहिती आहे का?

जयशंकर म्हणाले, दहशतवादी संघटना समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर कट्टरता पसरवण्यासाठी केला जात आहे. तसेच कारस्थान रचण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

सोशल मीडियात टुल किट बनवून कट्टरतेचा प्रसार केला जात आहे. हे तंत्रज्ञान सर्वांना सहजरित्या उपलब्ध आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचीही क्षमता वाढली आहे. याचा वापर करून दहशतवादी अगदी सहजरित्या हल्ला करू शकतात.

या वेळी बैठकीत आंतरराष्ट्रीय समुदायातील सदस्यांनी दहशतवादी घटनांमधून बचावलेल्या नागरिकांसाठी, दहशतवादाचा फटका बसलेल्या पीडीतासांसाठी, त्यांच्या कुटूंबाचे स्मरण करण्यासाठी एक मिनिटाचे मौन पाळले.

S. Jaishankar
One Nation One Uniform: पोलिसांसाठी 'एक राष्ट्र एक गणवेश' कल्पनेचा विचार करावा; पंतप्रधानांचे राज्यांना आवाहन

दहशतवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र ट्रस्ट फंडमध्ये भारताने 4 कोटी रूपये मदत देणार आहे. जयशंकर म्हणाले, दहशतवादाचा सर्वाधिक फटका आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांना बसत आहे. ल्लीत होत असलेल्या या बैठकीने आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादा विरोधातील एकजुट दाखवून दिली आहे.

दहशतवादी हल्ल्यांसाठी इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर, वित्तर पुरवठ्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि मानवरहित ड्रोन सारख्या उपकरणांद्वार होणाऱ्या हल्ल्यांचा सामना कसा करायचा या मुद्यांवर शनिवारी चर्चा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com