One Nation One Uniform: पोलिसांसाठी 'एक राष्ट्र एक गणवेश' कल्पनेचा विचार करावा; पंतप्रधानांचे राज्यांना आवाहन

बंदुकीच्या जोरावरील तसेच लेखणीच्या जोरावरील नक्षलवाद संपवायला हवा
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘एक राष्ट्र, एक गणवेश’ ही संकल्पना मांडली. विविध तपास दलांमध्ये एकसमानता आणण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले. राज्यांनी या कल्पनेचा एक सुचना म्हणून विचार करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. हरियाणातील सूरजकुंड येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय चिंतन शिबिरात ते बोलत होते. (One Nation One Uniform)

PM Narendra Modi
Amit Shah: भाजपचे मंत्री माईकच सोडेनात; अखेर अमित शाह यांनीच बंद करायला लावले भाषण!

पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व राज्यांचे गृह सचिव, डीजीपी, सशस्त्र सेना दलाचे अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले.

मोदी म्हणाले, पोलिसांसाठी ‘एक राष्ट्र, एक गणवेश’ ही फक्त एक कल्पना आहे. मी ती तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत नाहीय. हे पाच, 50 किंवा 100 वर्षात घडू शकेल. पण, त्याचा विचार आतापासून करायला हवा. राज्याराज्यांमध्ये गुन्ह्यांची उकल करण्यासाठी समन्वय असला पाहिजे. देशातील सर्व पोलिसांची ओळख समान वाटली पाहिजे.

PM Narendra Modi
कतरिना 1 लाखात, सलमान नावाचे खेचर 60 हजारात विकले; जाणून घ्या चित्रकूटच्या जत्रेची खासियत

मोदी म्हणाले, नक्षलवाद मग तो बंदुकीच्या जोरावरील असो की लेखणीच्या जोरावरील, आपल्याला सर्व प्रकारचा नक्षलवाद संपवायचा आहे. आपण 5G युगात प्रवेश केलाय, त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

मोदी म्हणाले, आज चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान, स्वयंचलित नंबर प्लेट ओळखण्याचे तंत्रज्ञान, ड्रोन आणि सीसीटीव्ही तंत्रज्ञानामध्ये अनेक पटींनी सुधारणा झाली आहे. भारतातील कायदा आणि सुव्यवस्था स्मार्ट कशी होईल हे पाहिले पाहिजे. आपल्याला 10 पावले पुढे राहावे लागेल. कायदा आणि सुव्यवस्थेचा विकासाशी थेट संबंध आहे. त्यामुळे शांतता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com