
Explosives Found Bengaluru: बंगळूरुच्या कलासिपाल्या (Kalasipalya) बसस्थानकाजवळ स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाने (ATS) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, कलासिपाल्या बीएमटीसी (BMTC) बसस्थानकातील शौचालयाच्या बाहेर ठेवलेल्या एका पिशवीत सहा जिलेटिनच्या कांड्या (Gelatin Sticks) आणि काही डेटोनेटर्स (Detonators) सापडले. दोन्ही वस्तू एका प्लास्टिकच्या कव्हरमध्ये वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे या व्यस्त वाहतूक क्षेत्रात सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कलासिपाल्या पोलीस (Police) ठाण्याचे अधिकारी दहशतवादविरोधी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची सखोल तपासणी केली. पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त (DCP West) यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, "सहा जिलेटिनच्या कांड्या आणि काही डेटोनेटर्स एका कॅरी बॅगमध्ये बसस्थानकातील शौचालयाबाहेर सापडले आहेत. अद्याप एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलेला नाही."
अधिकाऱ्यांनी स्फोटकांचा स्रोत किंवा संशयितांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.
जिलेटिनच्या कांड्या हे स्वस्त स्फोटक पदार्थ आहेत, जे उद्योगांमध्ये खाणकाम (Mining) आणि बांधकाम (Construction) संबंधित कामांसाठी वापरले जातात. इमारती, रस्ते, रेल्वेमार्ग आणि बोगदे तयार करताना यांचा वापर होतो. डेटोनेटर्सशिवाय त्यांचा उपयोग करता येत नाही, कारण डेटोनेटर्समुळेच स्फोट होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.