EPFO New Rule
EPFO New RuleDainik Gomanatk

EPFO New Rule: नोकरी सोडली तरी पीएफवर व्याज मिळते? ईपीएफओच्या 'या' नियमामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

Provident Fund Rule: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरीच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच चिंता असते.
Published on

नवी दिल्ली: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरीच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच चिंता असते. अनेकदा चांगल्या संधीसाठी किंवा वैयक्तिक कारणास्तव कर्मचारी नोकरी सोडतात, तर कधी अनपेक्षितपणे नोकरी जाते. अशा वेळी, पीएफ (Provident Fund) खात्यात जमा असलेल्या पैशांवर व्याज मिळणे बंद होईल, या भीतीने अनेक जण घाईघाईने पैसे काढून घेतात. मात्र, ईपीएफओच्या (EPFO) नवीन नियमांनुसार, नोकरी सोडल्यानंतरही तुमच्या पैशांवर व्याज मिळत राहते, ही बाब अनेक कर्मचाऱ्यांना माहित नसते.

व्याज कधीपर्यंत मिळत राहते?

पूर्वीच्या नियमानुसार, जर पीएफ खात्यात ३६ महिने (३ वर्षे) कोणतेही योगदान झाले नाही, तर ते खाते 'इनऑपरेटिव्ह' मानले जात असे आणि त्यावर व्याज मिळणे बंद व्हायचे. मात्र, आता हे नियम बदलले आहेत. कर्मचारी जोपर्यंत ५८ वर्षांचा होत नाही, तोपर्यंत त्याच्या पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर नियमितपणे व्याज दिले जाते. तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी नोकरी सोडली तरी, पुढील १८ वर्षे तुमच्या खात्यातील पैशांची वाढ होत राहते. जोपर्यंत सदस्य ५८ वर्षांचा होऊनही पैसे काढत नाही, तोपर्यंत खाते निष्क्रिय मानले जात नाही.

EPFO New Rule
Goa Accident: हे कधी थांबणार? गोव्यात एकाच दिवशी 3 जणांचा अपघाती मृत्यू; सांकवाळ, वेळसाव, शिरगाव येथे तरुणांनी गमावला जीव

व्याजाचा सध्याचा दर आणि बदल

आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी पीएफवर सध्या ८.२५% दराने व्याज मिळत आहे. मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या बैठकीत हा दर ८% ते ८.२०% दरम्यान थोडा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी जी काही दर निश्चित होईल, तो तुमच्या जमा रकमेवर लागू राहील. शेअर बाजारातील चढ-उतारांचा पीएफच्या निश्चित व्याजावर परिणाम होत नसल्याने, ही गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते.

EPFO New Rule
Goa Crime: बाप ओरडला अन् काळजाचा तुकडा कायमचा दुरावला! शाळेत न गेल्यानं वडील ओरडले, 12 वर्षांच्या चिमुरड्यानं गळफास घेत संपवलं जीवन

कराचे नियम आणि सवलती

नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजाबाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. नोकरीत असताना मिळणारे व्याज हे करमुक्त (Tax-free) असते (जर वार्षिक योगदान २.५ लाखांपेक्षा कमी असेल तर). परंतु, नोकरी सोडल्यानंतरच्या कालावधीत मिळणारे व्याज हे टॅक्सेबल (Taxable) असू शकते. त्यामुळे कर नियोजनाच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे.

जर तुम्ही दोन महिन्यांहून अधिक काळ बेरोजगार असाल, तर तुम्ही पीएफची पूर्ण रक्कम काढू शकता. मात्र, जर तुम्ही नवीन नोकरी जॉइन केली असेल, तर जुना पीएफ नवीन खात्यात ट्रान्सफर (Transfer) करणे सर्वात फायदेशीर ठरते. यामुळे तुमची सेवा सलग मानली जाते, ज्याचा फायदा भविष्यात १० वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या पेन्शनसाठी होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com