Himachal Pradesh Election: हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान

निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; 8 डिसेंबर रोजी निकाल
Himachal Pradesh Assembly Election 2022
Himachal Pradesh Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Himachal Pradesh Election: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यातील 68 जागांसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी निकाल असेल, अशी माहिती, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Himachal Pradesh Assembly Election 2022
Govt On Electoral Bond: राजकीय पक्षांना निधी गोळा करण्यासाठी ही पारदर्शक पद्धत

या निवडणुकीत 80 हून अधिक वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग आणि कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांना मतदान केंद्रात यावे लागणार नाही. निवडणूक आयोगाकडून अशा मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, सध्या हिमाचल प्रदेशात कर्मचाऱ्यांच्या समस्या, महागाई, बेरोजगारी आणि पोलिस पेपर लीक प्रकरण हे चार मुद्दे जास्त प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशातील सध्याच्या विधानसभा सभागृहाची मुदत 8 जानेवारी रोजी संपणार आहे. राज्यातील 68 पैकी 20 जागा आरक्षित असणार आहेत, त्यातील 17 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

Himachal Pradesh Assembly Election 2022
Gyanvapi Case: जिल्हा न्यायाधीशांचा मोठा निर्णय, 'शिवलिंगाचे कार्बन डेटिंग होणार नाही'

हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या 68 जागा आहेत. गतवेळी 2017 मध्ये 9 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान झाले होते. तेव्हा 68 पैकी 44 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. भाजपने जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्री केले होते. दरम्यान, या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम स्टेट असलेल्या गुजरात मध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. गुजरातमधील निवडणुकीचा कार्यक्रम 20 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

17 ऑक्टोबर- निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार

25 ऑक्टोबर- अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस

27 ऑक्टोबर- अर्ज छाननी

29 ऑक्टोबर- अर्ज माघारीचा अखेरचा दिवस

12 नोव्हेंबर- मतदान

8 डिसेंबर- निकाल

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा या शुक्रवारी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या. सोलन येथील मंदिरात त्यांनी पूजा केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com