Rajya Sabha: विरोधी पक्षांचे आणखी दहा खासदार राज्यसभेतून निलंबित

Monsoon Sessions of Parliament: विरोधी पक्षांच्या आणखी दहा खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
Rajya Sabha
Rajya SabhaDainik Gomantak

Monsoon Sessions of Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्याप्रकरणी 10 राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव, डॉ. शंतनू सेन आणि डोला सेन यांच्यासह 10 खासदारांना आठवड्याच्या उर्वरित भागासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, निलंबित खासदारांमध्ये सुष्मिता देव, डॉ शंतनू सेन आणि डोला सेन यांच्याशिवाय मौसम नूर, शंतनू, नदीमुल आणि गिरी रंजन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, लोकसभेतील गदारोळामुळे सभापती ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या (Congress) चार सदस्यांना संपूर्ण सत्रासाठी निलंबित केल्यानंतर ही कारवाई झाली आहे. लोकसभेत गदारोळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार ज्योतिमणी, मणिकम टागोर, टीएन प्रतापन आणि रम्या हरिदास यांना सोमवारी निलंबित करण्यात आले.

Rajya Sabha
National Herald Case: राहुल गांधींना घेतले ताब्यात "देशात पोलिस राज, मोदीजी राजा..."

दुसरीकडे, विरोधी खासदारांच्या सततच्या गदारोळात सोमवारी दुपारी 2.30 वाजता लोकसभेचे कामकाज तहकूब करताना सभापती ओम बिर्ला यांनी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले होते. फलक दाखवणाऱ्या खासदारांना सभागृहाबाहेर आंदोलन करण्यास सांगण्यात आले. यानंतर बिर्ला यांच्या दालनात सर्व पक्षीय बैठक पार पडली, ज्यामध्ये विरोधी पक्षांनी सभापती बिर्ला यांना सभागृहात फलक न दाखवण्याचे आणि गदारोळ न करण्याचे आश्वासन दिले.

तसेच, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले असतानाही सभागृहात फलक लावून गदारोळ झाला. यानंतर सभापती बिर्ला यांनी कठोर निर्णय घेत काल चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

Rajya Sabha
National Herald Case: राहुल गांधींना ईडीने पुन्हा बोलावले

शिवाय, वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीच्या (GST) मुद्द्यावरील विरोधी पक्षाच्या खासदारांनी दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) या मुद्यावर संसदेत येऊन उत्तर द्यावे, अशी मागणी या खासदारांनी केली होती. महागाईच्या (Inflation) मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरु झाले आहे, मात्र विविध मुद्द्यांवर विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सातत्याने विस्कळीत होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com