National Herald Case: सोनिया गांधी यांची आज अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीचा निषेध करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व करत राहुल रस्त्यावर बसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. महागाई, जीएसटी आणि केंद्रीय एजन्सीचा गैरवापर यासह अनेक मुद्द्यांवर ते निषेध करत होते.
दरम्यान, सुमारे 30 मिनिटे चाललेल्या गोंधळानंतर, काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या बसमधून त्यांना घेऊन जाण्यात आले त्या बसमध्ये इतर कॉंग्रेस खासदारही होते. अटकेपूर्वी राहुल गांधी म्हणाले की, 'भारतात पोलिस राजवट निर्माण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) या राजवटीचे राजा आहेत.'
दुसरीकडे, नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना आज चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयात बोलावण्यात आले. यावेळी सोनिया गांधी यांच्याबरोबर प्रियंका गांधी वड्रा तपास यंत्रणेच्या कार्यालयात पोहोचल्या. संसदेतील आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी राहुल गांधीही तिथे पोहोचले होते.
शिवाय, संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाच्या चार खासदारांना निलंबित आले. दुसरीकडे, विजय चौकात राष्ट्रपती भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचे नियोजन करणाऱ्या खासदारांनाही रोखण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.