Ed Raid: दारू घोटाळ्याप्रकरणी ED ची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.
Ed Raid over Excise Policy
Ed Raid over Excise PolicyDainik Gomantak
Published on
Updated on

Ed Raid over Excise Policy: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. बेंगळुरू, हैदराबाद, नेल्लोर, चेन्नईसह 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि यूपीमध्येही शोध सुरू आहेत. दिल्लीच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात ईडीने सुमारे 40 ठिकाणी छापे टाकल्याचे सांगितले जात आहे.

Ed Raid over Excise Policy
लखनौच्या हजरतगंजमध्ये भीषण अपघात, घराची भिंत कोसळून दोन मुलांसह 9 जणांचा मृत्यू

यापूर्वीही ईडीने छापे टाकले होते

यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 6 सप्टेंबर रोजी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. ईडीने दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यातील 30 ठिकाणी छापे टाकले होते.

Ed Raid over Excise Policy
Earthquake in Ladakh: लडाखमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर 4.8 तीव्रता 

भाजपने आपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते

भाजपने दिल्लीतील दारू धोरणाबाबत सत्ताधारी आम आदमी पार्टी (AAP) वर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यानंतर मनीष सिसोदिया भाजपवर हल्लाबोल करताना म्हणाले होते, की छाप्यात काहीही सापडले नाही. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सिसोदिया यांचा बचाव करताना भाजपवर टिका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com