
भारतीय निवडणूक आयोगाने एक मोठे पाऊल उचलले. आयोगाने एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आयोगाच्या या पावलामुळे कोट्यवधी मतदार, निवडणूक अधिकारी आणि विविध पक्षांच्या नेत्यांना मोठा फायदा होणार आहे. हे नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म अनेक कामे खूप सोपी करणार आहे.
निवडणूक आयोगाने (Election Commission) 'ECINET' नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केले. देशभरातील कोट्यवधी लोक अॅप आणि वेबद्वारे या प्लॅटफॉर्मचा वापर करु शकतील. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने निवडणुकीशी संबंधित अनेक कामे एकाच ठिकाणी करता येतील. रविवारी (4 मे) निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली.
ECINET या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे निवडणुकीशी संबंधित अनेक कामे सोपी होणार आहेत, याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की, वेगवेगळ्या अॅप्स आणि वेबवर उपलब्ध असलेल्या सुमारे 40 सेवांचा लाभ आता एकाच ठिकाणी घेता येईल. ECINET वर यूजर्स Voter Helpline, Voter Turnout, CVIGIL, Suvidha 2.0, ESMS, Saksham आणि KYC चे काम सहजपणे करता येईल.
ECINET लॉन्च झाल्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांना निवडणुका किंवा निवडणूक आयोगाशी संबंधित विविध कामांसाठी अनेक अॅप्स इन्स्टॉल करण्याची आवश्यकता राहणार नाही. याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या अॅप्ससाठी आयडी किंवा पासवर्ड लक्षात ठेवावा लागणार नाही. निवडणूक आयोगाच्या या एकाच प्लॅटफॉर्मवर थेट फायदा संपूर्ण निवडणूक प्रणालीला तसेच सुमारे 100 कोटी मतदारांना होईल. ECINET चा प्रस्ताव काही काळापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एका बैठकीत दिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.