घटस्फोटित एअर होस्टेस टार्गेट, करोडोंची फसवणूक; शिक्षण MBA, दुबई रिटर्न 'रिकी बहल'ला गोव्यात अटक

कंपनीचा जनरल मॅनेजर असल्याचे भासवून आरोपी प्रथन त्यांच्याशी मैत्री आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून लाखो रूपयांची फसवणूक करायचा.
Dubai Return Delhi Man Arrested in Goa For Cheating Air Hostess on the Pretest of Marriage
Dubai Return Delhi Man Arrested in Goa For Cheating Air Hostess on the Pretest of Marriage Dainik Gomantak

Dubai Return Delhi Man Arrested in Goa For Cheating Air Hostess on the Pretest of Marriage: घटस्फोटित महिलांना मॅट्रिमोनिअल साइट्सवर संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून, फसवणूक करणाऱ्या हायप्रोफाईल आरोपीला गोव्यात अटक करण्यात आली आहे.

कंपनीचा जनरल मॅनेजर असल्याचे भासवून आरोपी प्रथन त्यांच्याशी मैत्री आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून लाखो रूपयांची फसवणूक करायचा. दिल्लीच्या IGI विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अंशुल जैन असे या आरोपीचे नाव आहे. अंशुल दुबई रिटर्न असून तो अस्खलित इंग्रजी बोलतो. आरोपीने फायनान्समध्ये एमबीए देखील केले आहे. बंगळुरू येथील एका एअर होस्टेसची दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर फसवणूक केल्याप्रकरणी गोव्यातून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पीडित महिलेने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती, महिलेचे सुमारे 18 लाखांचे सोने, दागिने, एटीएम कार्ड इत्यादी घेऊन एक व्यक्ती पळून गेल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. एका मॅट्रिमोनियल साइटवरून त्यांची मैत्री झाल्याची माहिती महिलेने पोलिसांनी दिली. महिलेच्या तक्रारीवरून, आयजीआय विमानतळ पोलिस ठाण्यात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला.

Dubai Return Delhi Man Arrested in Goa For Cheating Air Hostess on the Pretest of Marriage
Mahadayi Water Dispute: सागराच्या साक्षीने म्हादई नदी वाचविण्याची साद

तक्रार दाखल झाल्यानंतर तब्बल 10 दिवस पोलिस पथक संशयित आरोपीचा तपास करत होते. अखेर अंशुल जैन गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, आणि त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी आरोपीकडून पीडित महिलेचे सामान आणि दागिने जप्त केलेत. पण, पीडित महिलेने लग्नात पाहुण्यांना देण्यासाठी आणलेल्या इतर महागड्या भेटवस्तू अद्याप परत मिळू शकलेल्या नाहीत.

नेमकं घडलं काय?

आरोपीने लग्न करायचे असे सांगून पीडित एअर होस्टेसला कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्लीला बोलावले होते. एअर होस्टेसने आरोपीच्या नातेवाईकांसाठी महागड्या भेटवस्तू आणल्या होत्या आणि लग्न समारंभासाठी ती स्वत: देखील दागिने घालून आली होती.

एअर होस्टेसने सर्व सामानाच्या बॅगा कारमध्ये ठेवताच त्याने कार पंक्चर झाल्याचा बहाना केला आणि फरार झाला. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार केली.

Dubai Return Delhi Man Arrested in Goa For Cheating Air Hostess on the Pretest of Marriage
BSF Shoots Pak Drone: अमृतसरमध्ये बीएसएफची मोठी कारवाई, दोन दिवसांत पाडला चौथा पाकिस्तानी 'ड्रोन'

दरम्यान, अंशुल जैन याच्यावर यापूर्वी उदयपूरमध्येही असाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिथेही त्याने घटस्फोटित एअर होस्टेससोबत अशीच फसवणूक केली होती. महिलेला हॉटेलमध्ये सोडून तो सामानासह फरार झाला होता.

चौकशीत तो अनेक मुलींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फसवणुकीचे पैसे घेऊन तो ऐषोरामी जीवन जगतो आणि मॅट्रिमोनिअल साईट्सच्या माध्यमातून घटस्फोटित महिलांना टार्गेट करून लाखोंची फसवणूक करतो. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com