BSF Shoots Pak Drone: सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी गेल्या दोन दिवसांत चौथ्यांदा पाकिस्तानच्या नापाक कृत्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी गेल्या दोन दिवसांत पाकिस्तानातून येणारे चार ड्रोन पाडले आहेत.
दरम्यान, बीएसएफनकडून (BSF) सांगण्यात आले की, त्यांनी पाकिस्तानी ड्रोन पाडले आणि पंजाबमधील अमृतसर येथून संशयित अमली पदार्थ असलेली बॅग जप्त केली. बीएसएफने पुढे सांगितले की, गेल्या दोन दिवसांत पाडलेले हे त्यांचे चौथे ड्रोन आहे.
बीएसएफ पंजाब फ्रंटियरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, एका पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले, ज्याला अमृतसर सेक्टरमध्ये तैनात भारतीय सैन्याने पाडले. झडतीदरम्यान ड्रोनमधून संशयित अमली पदार्थांची बॅग जप्त करण्यात आली.
दुसरीकडे, शनिवारी रात्री चौथ्या ड्रोनने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात आले. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी 24 तासांत पंजाबमधील (Punjab) आंतरराष्ट्रीय सीमेवर चार पाकिस्तानी ड्रोन अडवून ते पाडले. बीएसएफने शुक्रवारी रात्री तीन ड्रोन रोखले, तर चौथे ड्रोन शनिवारी रात्री पाडण्यात आले.
प्रवक्त्याने सांगितले की, 'अमृतसर जिल्ह्यातील उधर धारिवाल गावातून पहिले ड्रोन 'डीजेआय मॅट्रिस 300 आरटीके' असलेले काळे क्वाडकॉप्टर जप्त करण्यात आले.'
बीएसएफच्या जवानांनी शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) रोखून गोळीबार केला, असे त्यांनी सांगितले.
तसेच, अमृतसर जिल्ह्यातील रतन खुर्द गावात रात्री 9.30 च्या सुमारास सैन्याने गोळीबार केल्यानंतर असेच क्वाडकॉप्टर ड्रोन जप्त करण्यात आले.
प्रवक्त्याने सांगितले की, रतन खुर्द गावात सापडलेल्या यूएव्हीमधून 2.6 किलो संशयित हेरॉईन असलेली ड्रोनशी जोडलेली दोन पाकिटेही जप्त करण्यात आली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.