New Governors Appointment
New Governors AppointmentDainik Gomantak

New Governor Appointment: महाराष्ट्र-आसाम-बिहारसह 13 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती

13 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.
Published on

राष्ट्रपती मुर्मुंनी रविवारी 13 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. राष्ट्रपतींनी जारी केलेल्या यादीनुसार गुलाबचंद कटारिया यांची आसामचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

याशिवाय राजेंद्र विश्वनाथ यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना सिक्कीमचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. सीपी राधाकृष्ण यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचबरोबर शिवप्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • राज्यपालांची बदलेली राज्ये

मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वभूषण हरिचंदन यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

New Governors Appointment
Delhi-Mumbai Expressway : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार दिल्ली-मुंबई महामार्गाचं उद्घाटन

यासह केंद्र सरकारने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विशेष म्हणजे भगतसिंग कोश्यारी हे सतत वादात अडकत होते. नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमात दिलेल्या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता. 

त्यांच्यावर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार टीका केली होती. यानंतर या पदावर कायम न राहण्याची इच्छा व्यक्त करण्याबरोबरच त्यांनी आपला राजीनामा केंद्र सरकारकडे पाठवला, तो केंद्र सरकारने स्वीकारून त्यांना पदावरून मुक्त केले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com