Delhi-Mumbai Expressway : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार दिल्ली-मुंबई महामार्गाचं उद्घाटन

आता मुंबई ते दिल्लीमधील अंतर गाठा अवघ्या 12 तासात
Delhi-Mumbai Expressway
Delhi-Mumbai ExpresswayDainik Gomantak
Published on
Updated on

भारताला दळणवळणाच्या बाबतीत समृद्ध करण्याच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग, समृद्धी महामार्ग असे महत्वाचे महामार्ग बनवल्यानंतर आता दिल्ली आणि मुंबईला जोडणारा द्रुतगती महामार्ग अस्तित्वात येत असून या मार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागपूर - मुंबई या शहरामधील अंतर कमी झाल्यानंतर आता दिल्ली मुंबईचं (Delhi-Mumbai Expressway) अंतर कमी होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) या महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत.

हा देशातली सर्वात लांब महामार्ग असून या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. या महामार्गामुळे मुंबई ते दिल्लीमधील अंतरगाठायला आता फक्त 12 तास लागणार आहेत. तर दिल्ली ते जयपूर 5 तासांमध्ये पोहोचता येणार आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) या महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत. त्यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महामार्गाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. या महामार्गाची पहिली झलक त्यांनी देशवासीयांना दिली आहे.

हा देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे असून दिल्ली मुंबई-एक्स्प्रेस वेच्या पहिल्या टप्प्याचे 246 किमीचं काम पूर्ण झाला आहे. या महामार्गाकरिता आतापर्यंत सुमारे 12,150 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई प्रवासाचा वेळ देखील 24 तासांवरून 12 तासांपर्यंत येणार आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग तयार करताना 8 लेन तयार करण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com