Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती

आज 21 जुलै 2022 रोजी द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली.
Draupadi Murmu become 15th President of India
Draupadi Murmu become 15th President of IndiaDainik Gomantak

Presidential Election 2022: आज 21 जुलै 2022 रोजी देशाला द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात 15 वे राष्ट्रपती मिळाल्या आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर गुरुवारी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनामध्ये मतमोजणी पार पडली. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार होत्या तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा रिंगणात होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना 812 मते, तर यशवंत सिन्हा यांना 521 मते मिळाली आहे. (Draupadi Murmu become 15th President of India)

आज एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. अशा रितीने मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओडिशा राज्यातून येतात.

Draupadi Murmu become 15th President of India
Presidential Election Result: पारड कुणाचं जड होणार? देशाचे पुढील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला विजय झाला आहे. पक्षानेही विजयी मिरवणुकीची तयारीला सुरूवात केली आहे. एवढेच नाही तर द्रौपदी मुर्मू यांच्या विजयामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 3 किमी रोड शो करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात अनेक केंद्रीय मंत्रीही सहभागी होणार आहेत.

दरम्यान, द्रौपदी मुर्मूच्या राष्ट्रपती होण्याच्या दिशेने वाटचाल केल्यानंतर देशाच्या अनेक आदिवासी भागात नृत्य आणि जल्लोश केला जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 540 तर यशवंत सिन्हा यांना 240 मते मिळाली. तर दुसऱ्या फेरीत आतापर्यंत एकूण 1138 मतांची मोजणी झाली आहे. या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना 809 आणि यशवंत सिन्हा यांना 329 मते मिळाली. या निवडणूकीत कटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा आणि पंजाब या राज्यांचा समावेश असून तिसऱ्या फेरीत एकूण 1,333 वैध मते पडली आहेत. तर वैध मतांचे एकूण मूल्य 1,65,664 आहे. याच बरोबर द्रौपदी मुर्मू यांना 812 मते आणि यशवंत सिन्हा यांना 521 मते मिळाली आहेत.

Draupadi Murmu become 15th President of India
गोव्यात विरोधकांचीही मते द्रौपदी मुर्मू यांना मिळणार

द्रौपदी मुर्मूंच्या गावात लोक आनंद साजरा आहेत. विजयाची घोषणा होण्याआधीच संपूर्ण गाव जल्लोषात व्यस्त आहे. शालेय विद्यार्थिनी नाच-गाणी करत आनंदोत्सव साजरा करत असताना गावात 20 हजार लाडू बनवण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com