Presidential Election Result: पारड कुणाचं जड होणार? देशाचे पुढील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?

आज 21 जुलै 2022 रोजी देशाला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत.
yashwant sinha And Draupadi Murmu
yashwant sinha And Draupadi MurmuDainik Gomantak
Published on
Updated on

आज 21 जुलै 2022 रोजी देशाला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर गुरुवारी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनामध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनणार आहेत. ((Presidential Election Counting Today Draupadi Murmu latest news)

yashwant sinha And Draupadi Murmu
काळजी घ्या! जगात 14 हजार लोकांना मंकीपॉक्सची लागण, 5 मृत्यू

15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 21 जुलै रोजी भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 15 वर्षांपूर्वी 21 जुलै रोजी प्रतिभा देवीसिंह पाटील (Pratibha Patil) यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत प्रतिभा देवीसिंह पाटील विजयी झाल्या आणि त्यानंतर 25 जुलै 2007 रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती.

प्रतिभा देवीसिंह पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

प्रतिभा देवीसिंह पाटील देशाच्या 12व्या राष्ट्रपती झाल्या आणि 2007-2012 मध्ये त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला. देशातील हे सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या प्रतिभा पाटील या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर आता एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्या तर त्या आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनतील तसेच पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती देखील बनतील.

yashwant sinha And Draupadi Murmu
स्मृती इराणींच्या गोव्यातील हॉटेलचा अबकारी खाते परवाना बेकायदेशीर ?

सध्या देशाचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार असून नवे राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेणार आहेत. सर्व राज्यांतील मतपत्रिका संसद भवनामध्ये आणण्यात आल्या आहेत. संसदेच्या ६३ क्रमांकाच्या खोलीत मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी सज्ज झाले आहेत तर या सभागृहात चोवीस तास मतपत्रिकांची सुरक्षा करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com