गोव्यात विरोधकांचीही मते द्रौपदी मुर्मू यांना मिळणार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा; मुर्मू प्रचारासाठी गोव्यात; भाजपकडून जल्लोषात स्वागत
Draupadi Murmu in Goa
Draupadi Murmu in GoaDainik Gomantak

पणजी : ‘एनडीए’च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील विरोधी गटाचीही मते मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. मुर्मू या प्रचारासाठी काल गोव्यात आल्या होत्या. त्यांनी भाजपसह मित्रपक्षांचे आमदार, खासदार यांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, मुर्मू यांना भाजपचे 20 आमदार मित्रपक्ष असणाऱ्या मगोपचे दोन आणि अपक्ष तीन यांच्यासह भाजपच्या दोन खासदारांची मते मिळतीलच. याशिवाय विरोधी पक्षातील आमदार, खासदारही मुर्मू यांना मतदान करतील आणि त्यांना देशभर मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून त्या मताधिक्याने विजयी होतील.

Draupadi Murmu in Goa
अधिवेशनादरम्यान विरोधक आमदार आले सभापतींच्या हौदात

राष्ट्रपतीपदासाठी येत्या 18 जुलै रोजी निवडणूक होणार असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना गोव्यातून किमान 30 मते मिळतील, असा दावा भाजपचे काही नेते खासगीत करत आहेत. त्यामुळे अजूनही काँग्रेस पक्षाला पक्षांतराचा धोका कायम असल्याचे हे संकेत आहे. काँग्रेस पक्षाचे काही आमदार केवळ काही काळापुरते थांबले आहेत. संधी मिळताच कोणत्याही क्षणी ते निसटण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com