India Census 2027: 2027च्या जनगणनेत भिकाऱ्यांची मोजणी होणार नाही! मोदी सरकारचा मोठा निर्णय; नवीन नियमावली जाहीर

Census 2027 Questionnaire New Changes Rule: भारतात 2027 मध्ये होणाऱ्या आगामी जनगणनेबाबत मोदी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्याबाबतची अधिकृत अधिसूचनाही जारी करण्यात आली.
Census 2027 Questionnaire New Changes Rule
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

India Census 2027 beggars & Vagrants Category Dropped: भारतात 2027 मध्ये होणाऱ्या आगामी जनगणनेबाबत मोदी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्याबाबतची अधिकृत अधिसूचनाही जारी करण्यात आली. या नव्या निर्णयानुसार, भारताच्या (India) जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच भिकारी आणि भटक्या लोकांचा स्वतंत्र डेटा गोळा केला जाणार नाही. जनगणनेच्या प्रश्नावलीतून हा विशिष्ट वर्गच हटवण्यात आला.

2011च्या जनगणनेत या प्रवर्गातून अत्यंत कमी आणि संशयास्पद माहिती समोर आली होती. त्यावेळी केवळ 3.8 लाख लोकांनी स्वतःची ओळख भिकारी किंवा भटके म्हणून केली होती. समाजात बदनामी होण्याच्या भीतीमुळे लोक ही माहिती देण्यास कचरत असत आणि यावरुन अनेकदा अधिकाऱ्यांशी वादही निर्माण होत असत. त्यामुळे हा डेटा अविश्वसनीय मानून या वेळी ही वर्गवारीच रद्द करण्यात आली.

Census 2027 Questionnaire New Changes Rule
PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

या नव्या जनगणनेच्या नियमांनुसार, व्यक्तीने सांगितलेला व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहारच नोंदवला जाणार आहे. 1991 मध्ये ही संख्या 5.4 लाख, 2001 मध्ये 6.3 लाख आणि 2011 मध्ये घटून 3.8 लाखांवर आली होती. दरम्यान, नव्या प्रश्नावलीत शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न, स्थलांतर, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे शहर बदलणे यांसारखे प्रश्न पूर्वीप्रमाणेच विचारले जातील.

Census 2027 Questionnaire New Changes Rule
PM Modi Independence Day Speech: वर्षभरात 1 कोटी युवकांना AI प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग; तरुणांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा!

याशिवाय, या वेळच्या जनगणनेत एक नवा बदल करण्यात आला. जर आई-वडील एका घरात राहत नसतील किंवा हयात नसतील, तर त्यांच्या जन्माची तारीख, ठिकाण आणि धर्माची माहिती देणारे नवीन कॉलम समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे अंतरधर्मीय विवाह, धर्मपरिवर्तन आणि नागरिकत्व कायद्यांतर्गत नागरिकत्वाच्या अटी पूर्ण करणाऱ्या लोकांची अचूक आकडेवारी मिळण्यास मदत होणार आहे.

Census 2027 Questionnaire New Changes Rule
PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

तसेच, डेटा संकलनादरम्यान नागरिकांकडून मोबाईल नंबर, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि इतर अधिकृत ओळखपत्रांची माहिती (उपलब्ध असल्यास) गोळा केली जाईल. मात्र, ही माहिती देणे पूर्णपणे ऐच्छिक असेल. जर एखादी व्यक्ती गोपनीयतेच्या कारणास्तव ही माहिती देण्यास इच्छुक नसेल, तर अधिकारी ती जागा रिकामी सोडतील. नागरिकांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आणि गुप्त राहील, असा विश्वास दिला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com