Delhi Terror Attack: राजधानी दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, होळीपूर्वी 'लष्कर-ए-तैयबा'कडून मोठ्या स्फोटाची तयारी

Delhi Holi Terror Alert: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे.
Delhi Terror Attack
Delhi Terror AttackDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे. आगामी होळीच्या सणापूर्वी दिल्लीत मोठा आयईडी (IED) स्फोट घडवून आणण्याचा कट 'लष्कर-ए-तैयबा' या दहशतवादी संघटनेने रचल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर संपूर्ण दिल्लीत हाय-अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

लाल किल्ला आणि चांदनी चौक लक्ष्यावर

गुप्तचर विभागाला मिळालेल्या ताज्या इनपुटनुसार, दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला आणि गजबजलेला चांदनी चौक परिसर आहे. विशेषतः चांदनी चौक भागातील प्रसिद्ध आणि जुनी मंदिरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून जास्तीत जास्त जीवितहानी करण्याचा या संघटनेचा मनसुबा आहे. या माहितीनंतर दिल्ली पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलांनी या भागांत गस्त वाढवली असून संशयितांवर करडी नजर ठेवली जात आहे.

Delhi Terror Attack
Goa Crime: कुंपणच शेत खातं तेंव्हा..! अपघात झाला, चालक झाला गंभीर जखमी; संधी साधून कॉन्स्टेबलने पळवले 8 लाखांचे दागिने

पाकिस्तानमधील घटनेचा सूड घेण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील एका मशिदीत मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा बदला घेण्यासाठी 'लष्कर-ए-तैयबा' भारतात, विशेषतः दिल्लीत साखळी स्फोट घडवण्याच्या तयारीत आहे. आयईडी (IED) चा वापर करून हे हल्ले केले जाऊ शकतात, अशी भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीत याआधी १० नोव्हेंबर २०२५ रोजी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला होता. वाहतूक कोंडीत अडकलेली ही कार अचानक स्फोटाने उडाली होती, ज्यामध्ये अनेक वाहने जळून खाक झाली होती आणि निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. तपासात असे समोर आले होते की, ती कार स्फोटापूर्वी तीन तास लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये उभी होती. त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता पार्किंग स्थळांपासून ते बाजारपेठांपर्यंत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Delhi Terror Attack
Goa Cricket: गोव्याच्या पूर्वजाला 'बक्षिसी', विभागीय संघात निवड; पूर्वा राखीव खेळाडूंत

सुरक्षा यंत्रणांकडून 'कोम्बिंग ऑपरेशन' सुरू

मिळालेल्या इशाऱ्यानंतर दिल्ली पोलिसांनी शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा कडे वाढवले आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. तसेच हॉटेल आणि लॉजेसमध्येही तपासणी मोहीम राबवली जात आहे. नागरिकांना कोणत्याही बेवारस वस्तू दिसल्यास किंवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com