Video: ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ घोषणा देणाऱ्यांना अमित शाहांनी सुनावलं, म्हणाले..

Amit Shah on Rahul Gandhi
Amit Shah on Rahul GandhiGomantak Digital

Amit Shah Attack Congress Over Modi teri kabar khudegi Remark

काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला जातो असा आरोप करताना गृहमंत्री अमित शाहांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा स्तर खालावला आहे. ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’, अशा घोषणा काँग्रेसकडून दिल्या जातात. तर आम आदम पक्ष म्हणतोय, ‘मोदी मर जाओ’. पण तुमच्या बोलण्याने काही होत नाही. १३० कोटी जनता मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतेय, असं अमित शाहांनी सुनावलं आहे.

अमित शाहांनी शुक्रवारी कर्नाटकमधील बीदर येथे जनसभेला संबोधित केले. बीदरमधून विजय संकल्प यात्रेचा शुभारंभ होत असून या यात्रेबाबत शाहांनी सभेत माहिती दिली. कर्नाटकमध्ये पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, यासाठी ही यात्रा नाहीये. कर्नाटकमधील गरीब जनतेच्या कल्याणाचा संकल्प करत आम्ही ही यात्रा काढतोय, असं शाहा म्हणाले. या सभेत शाहांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा समाचार घेतला.

Amit Shah on Rahul Gandhi
Viral Video: 40 लाखांची लाच घेताना भाजप आमदाराच्या मुलाला अटक, घरात सापडले घबाड

‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ घोषणेवरुन टोला

काँग्रेसमध्ये नेहमीच वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला गेला. मग ते एस निजलिंगप्पा असो किंवा माजी मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील. वरिष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करावा, हे फक्त भाजपालाच माहितीये. काँग्रेसने हे मोदींकडून शिकावं,  असा दावाही त्यांनी केला.

मोदी तेरी कब्र खुदेगी असे नारे काँग्रेसमध्ये दिले जातात. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला नेमकं काय झालंय, असा सवालही त्यांनी विचारला. 'राहुल गांधींनी तुम्हाला काहीही सूचना करु दे, काँग्रेसच्या नेत्यांनो तुम्ही ऐका, मोदींना कितीही शिव्या दिल्या तरी तुम्हाला यश मिळणार नाही', असे शाहांनी सांगितले.

Amit Shah on Rahul Gandhi
'हिंदू धर्म रक्षा'साठी आंध्र प्रदेशात बांधली जाणार 3 हजार मंदिरे

‘काँग्रेस दुर्बिणीतूनही दिसत नाही’

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तिन्ही राज्यांमधील निवडणुकांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. काँग्रेसचा पराभव इतका भीषण आहे की आता दुर्बिणीतूनही काँग्रेस पक्ष दिसत नाही, असा चिमटा शाहांनी काढलाय.

आम आदमी पक्षावरही हल्लाबोल

मोदी मर जा, अशा घोषणा आम आदमी पक्षाकडून दिल्या जातात. पण अशा घोषणा आणि नारेबाजीमुळे फायदा होणार नाहीये. कारण मोदींच्या पाठिशी जनतेचे आशीर्वाद आहे, असं शाहा म्हणालेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com