अमित शहा म्हणाले, 'SIT समोर नरेंद्र मोदी नाटक करत गेले नव्हते...'

2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली क्लीन चिट सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
Amit Shah
Amit ShahTwitter/ @ANI

Gujarat Riots 2002: 2002 च्या गुजरात दंगलप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली क्लीन चिट सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मोदींवर आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्याचवेळी, त्यांनी एसआयटीसमोर मोदी आणि ईडीसमोर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चौकशीची तुलना केली आहे. (Gujarat Riots 2002 Supreme Court Narendra Modi Clean Chit Amit Shah BJP)

दरम्यान, नॅशनल हेराल्ड संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली. 13 जूनपासून सुरु झालेल्या चौकशीनंतर दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जोरदार निदर्शने केली होती. त्याचवेळी काँग्रेस नेत्याच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावरही उतरले होते.

भाजपने मोदींसाठी आंदोलन का केले नाही?

मुलाखतीदरम्यान भाजपच्या (BJP) प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारण्यात आला असता अमित शहा (Amit Shah) म्हणाले, 'न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आमचे मत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसआयटी काम करत होती. एसआयटीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दिली. मग यात आंदोलन करायची गरजचं नव्हती. आमच्यात कोणतीही व्यक्ती न्यायालयीन कक्षेच्या बाहेर नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com