Rain
RainDainik Gomantak

उष्णतेपासून मिळणार दिलासा, या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

येत्या काही दिवसांतही अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे.
Published on

देशातील काही राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतही दोन दिवसांपासून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे वातावरण थंड झाले आहे. गुरुवारपर्यंत असेच वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD)अंदाजानुसार देशातील सर्व भागात उष्णतेची लाट थांबली आहे. राजस्थान, पंजाब, नवी दिल्ली आणि हरियाणातील कमाल तापमानात 2-4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. दोन दिवसांनंतर वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात 2-3अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. (Weather Updates Today)

Rain
दिल्लीत आढळले कोरोनाचे 1414 नवे रुग्ण

पुढील तीन दिवस मध्य भारतातील बहुतांश भागात कमाल तापमानात कोणताही बदल अपेक्षित नाही, मात्र त्यानंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल. बुधवारपासून महाराष्ट्रातील कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. यासोबतच, पुढील दोन दिवसांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह हलका पाऊस, धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या लगतच्या भागात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rain
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आसाममध्ये 51 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

ओडिशामध्ये वादळ आणि पाऊस

IMD शास्त्रज्ञांनी सांगितले की, चक्रीवादळ वाऱ्यांच्या प्रभावाखाली या भागात 6 मे च्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. ते बदलून ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या आसपास पूर्व किनार्‍याकडे सरकेल. हे वादळ 9 मे च्या सुमारास पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या आसपास पूर्व किनार्‍याकडे सरकू शकते. परिणामी कटक आणि भुवनेश्वरच्या काही भागात पुढील काही तासांत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वीज पडू नये म्हणून लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हरियाणा-राजस्थानमध्ये उष्णतेची लाट

दरम्यान, मंगळवारी उत्तर-पश्चिम राजस्थान आणि दक्षिण हरियाणाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम होती. राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणाचा बहुतांश भाग, हरियाणाचा काही भाग, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातच्या काही भागात तापमान 40-42 अंश सेल्सिअस राहिले. वायव्य भारत आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. बुधवारपासून महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा एकदा उष्णतेची लाट निर्माण होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com