संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Sindhudurg elephant attack: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल असून, प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Goa Maharashtra animal cruelty news
Sindhudurg elephant attack | Elephant Omkar bomb incidentDainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदुर्ग: गेल्या काही दिवसांपासून गोवा आणि महाराष्ट्राच्या हद्दीत ओंकार हत्तीने धुमाकूळ घातला आहे. लहान असणारा हा हत्ती मुख्य कपळापासून दुरावल्यानंतर त्याचा गोवा – महाराष्ट्र सीमाभागात वावर सुरु आहे. ओकांरवर सुतळी बॉम्ब आणि फटाके फेकल्याचा संतापजनक प्रकार बांदा सावंतवाडी येथून समोर आला आहे. हत्ती नदीत आंघोळ करत असताना काही जणांना त्याच्यावर बॉम्ब आणि फटाके फेकले.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हत्ती बांदा येथील तुळसाण नदीत आंघोळीचा आनंद घेत होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक हत्तीला पाहण्यासाठी नदीकाठी आले होते. पण, काही जणांनी हत्तीवर सुतळी बॉम्ब आणि फटाके फेकून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल असून, प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Goa Maharashtra animal cruelty news
'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

ओकांर हत्तीमुळे जवळपास दोन महिन्यांपासून गोवा तसेच महाराष्ट्राच्या सीमाभागातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हत्ती काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान करत असून, त्याला वन्यअधिवासात पाठविण्यात यावे अशी मागणी दोन्ही राज्यातील सीमाभागातील नागरिक करत आहेत.

दरम्यान, याबाबत ठोस पाऊल अद्याप उचलल्याचे दिसत नाही. गोव्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी ओंकारला कर्नाटकात पाठविण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे वक्तव्य केले होते.

Goa Maharashtra animal cruelty news
Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

तर, महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी देखील ओंकार हत्तीचा बंदोबस्त करण्याबाबत वक्तव्य केले होते. हत्तीला वनतारामध्ये हलविण्याबाबत देखील विचार समोर आला होता.

दरम्यान. हत्तीमुळे सध्या भागात दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातच ओंकार हत्तीला दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. आता त्याच्यावर बॉम्ब फेकण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे. हत्तीला काही इजा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com