'Amanatullah Khan ने माझ्या घरी पैसे अन् शस्त्रे ठेवली,' हमीद अलीची ACB समोर कबुली

Amanatullah Khan: दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत.
Amanatullah Khan
Amanatullah KhanDainik Gomantak

Aam Aadmi Party: दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. अमानतुल्ला यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डासंबंधी कथित भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) ने शुक्रवारी छाप्यात लाखोंची रोकड आणि शस्त्रे जप्त केल्यानंतर अमानतुल्ला खान यांचा सहकारी हमीद अली खान याला अटक केली आहे.

एसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, आप आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांचे निकटवर्तीय हमीद अली खान यांनी एसीबीला सांगितले आहे की, अमानतुल्लाह यांनी माझ्या घरात शस्त्रे आणि रोख रक्कम ठेवली होती. सर्व व्यवहार त्यांच्या सूचनेनुसारच केले जात होते.

Amanatullah Khan
Amanatullah Khan: केजरीवालांना मोठा धक्का, आमदार अमानतुल्ला खान यांना अटक

दरम्यान, दिल्ली (Delhi) वक्फ बोर्डातील कथित भरती अनियमिततेच्या संदर्भात एसीबीने शुक्रवारी चार ठिकाणी छापे टाकून वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांना अटक केली. एसीबीने ज्या ठिकाणी छापे टाकले, त्यात हमीद अली यांच्या मालमत्तेचाही समावेश आहे. एसीबीने जामिया नगर येथील रहिवासी हमीद अली यांच्या घरातून विना परवाना शस्त्रे, 12 लाख रुपये रोख आणि काही काडतुसे जप्त केली आहेत. हमीद अली यांना दक्षिण-पूर्व जिल्हा पोलिसांनी (Police) आर्म्स अ‍ॅक्टतर्गंत अटक केली आहे.

एसीबीच्या छाप्यानंतर 3 एफआयआर दाखल

एसीबीच्या छाप्यानंतर पोलिसांनी तीन एफआयआर नोंदवले आहेत, त्यापैकी एक विना परवाना शस्त्र आणि काही काडतुसे जप्त केल्याप्रकरणी हमीद अली यांच्याविरुध्द (54) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हमीद अली यांना अटक करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Amanatullah Khan
NCRB: दिल्ली महिलांसाठी सर्वात 'असुरक्षित', जाणून घ्या या मोठ्या शहरांची रॅंकिंग

त्याचवेळी, जोगाबाई एक्स्टेंशन येथील रहिवासी कौशर इमाम सिद्दीकी यांच्या विरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सिद्दिकी यांच्या घरातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com