Amanatullah Khan: केजरीवालांना मोठा धक्का, आमदार अमानतुल्ला खान यांना अटक

ACB Raids AAP MLA Amanatullah Khan: आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार अमानतुल्ला खान यांना अटक करण्यात आली आहे.
Amanatullah Khan
Amanatullah Khan Twitter/ @ANI
Published on
Updated on

MLA Amanatullah Khan: आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार अमानतुल्ला खान यांना अटक करण्यात आली आहे. एसीबीने ही कारवाई केली आहे. एसीबीच्या पथकाने शुक्रवारी आमदार खान आणि त्यांच्या साथीदारांच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. तत्पूर्वी, एसीबीने गुरुवारी आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते अमानतुल्ला खान यांना वक्फ बोर्डाशी संबंधित दोन वर्षे जुन्या प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यातच आता अधिकाऱ्यांनी त्यांच्या अटकेची माहिती दिली.

दरम्यान, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष या नात्याने अमानतुल्ला खान यांच्यावर बेकायदेशीरित्या वक्फ मालमत्ता भाड्याने देणे, वक्फ बोर्डात 33 जणांची भरती करणे आणि वाहन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये एसीबीने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता. 2018 ते 2020 या कालावधीत गडबड झाल्याचा आरोप आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये, एसीबीने नायब राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, 'माननीय आमदार साहेबांना वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावे, कारण ते गुन्हेगार आहेत.'

Amanatullah Khan
"गुजरातमधील सर्व जागा लढवणार...": Delhi CM अरविंद केजरीवाल

दुसरीकडे मात्र, त्यांच्याविरुद्ध साक्ष देण्यास कोणीही तयार नाही. एसीबीने त्यांच्यावर 23 गुन्हे दाखल असल्याचेही सांगितले होते. एसीबीने अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांना चौकशीसाठी बोलावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com