National Crime Records Bureau: दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीबाबत NCRB चा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार 2021 मध्ये दिल्ली हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर होते. या वर्षी दररोज दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले. 2021 मध्ये दिल्लीत महिलांवरील 13,892 गुन्ह्यांची नोंद झाली, जी 2020 च्या तुलनेत 40% पेक्षा जास्त आहे. 2020 मध्ये हा आकडा 9,782 होता.
दरम्यान, 2021 मध्ये, राष्ट्रीय राजधानीत इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत अपहरण (3948), पतीकडून क्रूरता (4674) आणि मुलीवरील बलात्कार (833) या श्रेणींमध्ये महिलांविरुद्ध सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. 2021 मध्ये दिल्लीत दररोज सरासरी दोन मुलींवर बलात्कार झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
अहवालानुसार, 2021 मध्ये राष्ट्रीय राजधानीत महिलांवरील (Women) 13,982 गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर सर्व 19 महानगरांमध्ये एकूण गुन्हे 43,414 होते. 2021 मध्ये राजधानीत हुंडाबळी मृत्यूची 136 प्रकरणे नोंदवली गेली, जी 19 महानगरांमधील एकूण मृत्यूच्या 36.26 टक्के आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.