मंदिर बांधल्याने कुणाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत; हाय कोर्टाचे निरीक्षण

दक्षिण भारतीय शैलीत बांधलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धारही महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी सुमारे 300 वर्षांपूर्वी केला होता.
Its Constitutional Right To Construct Temple On Private Property Stays Allahabad High Court.
Its Constitutional Right To Construct Temple On Private Property Stays Allahabad High Court.Dainik Gomantak
Published on
Updated on

Its Constitutional Right To Construct Temple On Private Property Stays Allahabad High Court:

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील कल्की धाम मंदिराच्या बांधकामाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत, मंदिर बांधल्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर मंदिर उभारणीतील अडथळे दूर झाले आहेत. संभलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या बांधकामावर घातलेली बंदी असंवैधानिक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम हे मंदिर खाजगी जमिनीवर बांधत होते. हा परिसर मुस्लिमबहुल असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या बांधकामावर बंदी घातली होती.

आता उच्च न्यायालयाने प्रमोद कृष्णम यांना मंदिराचा नकाशा जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच मंदिराच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेची परवानगी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Its Constitutional Right To Construct Temple On Private Property Stays Allahabad High Court.
पतीचे स्वतःच्या आईशी संबंध असल्याचा आरोप करणे क्रूरता; हाय कोर्टाचे निरीक्षण

माहितीनुसार, आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांनी संभलच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात 30 ऑक्टोबर 2017 रोजी याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती सलील कुमार राय आणि न्यायमूर्ती सुरेंद्र सिंग यांच्या खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला घटनाबाह्य ठरवले.

न्यायालयाने म्हटले की, जर कोणाला खाजगी जमिनीवर इमारत बांधायची असेल तर ते ती बांधू शकतात कारण त्याला घटनेत हा अधिकार आहे.

प्रमोद कृष्णम यांच्या याचिकेनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी हा भाग अल्पसंख्याक बहुल असल्याचे सांगत मंदिर बांधण्यास परवानगी नाकारली.

येथील मुस्लिम मंदिर बांधण्यास विरोध करत होते. मंदिर बांधले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मंदिराजवळच सरकारी जमीन असून, त्यावर याचिकाकर्त्याने अतिक्रमण केले आहे.

Its Constitutional Right To Construct Temple On Private Property Stays Allahabad High Court.
अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी ओळखीचा पुरावा गरजेचा नाही; गैरप्रकार टाळण्यासाठी हाय कोर्टाचा निर्णय

आपल्या निर्णयात उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, धर्मस्थळ बांधण्याचा अधिकार घटनेच्या कलम 25 आणि 26 नुसार संरक्षित आहे.

मंदिराच्या बांधकामाला परिसरातील मुस्लिमांचा विरोध असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा जिल्हा प्रशासनाने सादर केला नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची भीतीही फोल ठरत आहे.

मनु महाराजांनी सुमारे एक हजार वर्षांपूर्वी संभलमध्ये प्राचीन कल्की मंदिर (Ancient Kalki Temple) बांधले होते. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धारही महाराणी अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांनी सुमारे 300 वर्षांपूर्वी केला होता.

काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम हेही त्यांच्या गावात कल्की मंदिराच्या नावाने धार्मिक स्थळ बांधणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com