Dattatreya Birth Story: त्रिदेवांना बाळ बनवणारी माता! अनुसूयेच्या पतिव्रताची अद्भुत कथा आणि दत्तात्रेयांचा जन्म

Dattatreya Jayanti 2025: भारताच्या आध्यात्मिक परंपरेतील आणि ऋषी संस्कृतीतील एक महत्त्वाचा उत्सव म्हणून दत्तात्रेय जयंतीचे अनन्यसाधारण स्थान आहे.
Dattatreya Birth Story
Dattatreya Birth StoryDainik Gomantak
Published on
Updated on

Dattatreya Birth History

हिंदू धर्मात दत्तजयंतीला अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दिवस मानला जाते. दत्तावताराची उपासना ही ज्ञान, संयम, शांतता आणि मोक्षाच्या मार्गाचे प्रतीक आहे. विशेषतः मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी होणारी दत्तजयंती ही भक्तांसाठी वर्षातील एक मोठी पर्वणी ठरते. या दिवशी दत्तभक्त उपवास, जप, ध्यान, गुरूचरित्र पारायण, दत्त परिक्रमा आणि सामूहिक कीर्तनाद्वारे दत्त गुरूंची भक्ती व्यक्त करतात.

पौराणिक कथा

एके काळी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देवतांना त्यांच्या पतींच्या देवत्वाचा आणि आपल्या पतिपूजा धर्माचा अभिमान वाटू लागला होता. नारद मुनींनी हा अहंकार दूर करण्यासाठी एक अद्भुत योजना आखली. ते तिन्ही देवींसमोर अनुसूया मातेच्या पतिव्रताची विलक्षण महिमा सांगू लागले. अनुसूया माता संपूर्ण लोकात पतिव्रता रूपात प्रसिद्ध असल्याने पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मनात ईर्षा निर्माण झाली. त्यांनी त्रिदेवांना – ब्रह्मा, विष्णू आणि महेश अनुसूयेची परीक्षा घेण्यास प्रवृत्त केले.

Dattatreya Birth Story
Goa Winter Tourism: हिवाळ्यात खरा आनंद घ्यायचाय? गोव्यातील 'हे' ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण

त्रिदेवांचे आगमन आणि परीक्षा

त्रिदेवांनी वृद्ध ऋषींचा वेश धारण करून अत्री ऋषींच्या अनुपस्थितीत अनुसूया मातेच्या आश्रमात आले. भिक्षा मागणाऱ्या अतिथींचे स्वागत करण्यासाठी त्या तत्परतेने उभ्या राहिल्या. पण भिक्षा स्वीकारण्याआधी तिन्ही भिक्षूंनी एक अट ठेवली, “तुम्ही आम्हाला निर्वस्त्र भोजन द्या.”

अनुसूया माता क्षणभर थबकल्या; परंतु त्यांना त्यांच्या पतिव्रता शक्तीची, सत्यतेची आणि धर्मरक्षणाची जाणीव होती. दिव्य दृष्टीने पाहताच त्यांना कळले की हे साधेसाधे भिक्षुक नसून स्वतः त्रिमूर्ती त्यांची परीक्षा पाहण्यासाठी आले आहेत.

पतीस्मरण आणि दिव्य संकल्प

आतिथ्यधर्म न सोडता, आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्याने त्यांनी प्रार्थना केली, “जर माझा पतिव्रत धर्म अखंड आणि सत्य असेल तर हे तीनही अतिथी सहा महिन्यांचे बालक होवोत.”

क्षणात त्रिदेव बाळरूप धारण करून रडू लागले. अनुसूया मातेनं त्यांना मायेने दूध पाजले, पाळण्यात घातले आणि मातृत्वाचे अलौकिक दर्शन घडवले.

Dattatreya Birth Story
Goa Politics: ‘गोंयकारपण’ सांभाळण्यासाठी फॉरवर्ड कटिबद्ध! सरदेसाईंचे आश्वासन; मयेवासीयांच्‍या समस्‍या सोडविण्‍यास भाजपला अपयश आल्याचा दावा

दिव्य वरदान

त्रिदेव परत न गेल्याने देवलोकात खळबळ उडाली. नारदांनी सर्व प्रकार देवतांना सांगितला. त्रिदेवांच्या पत्नी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती अनुसूया मातेपुढे येऊन क्षमा मागू लागल्या. अनुसूयाने त्यांना क्षमाही केली आणि आपल्या पतिव्रत शक्तीने त्रिदेवांना त्यांच्या मूळ स्वरूपात परत आणले.

त्रिदेव अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी अनुसूयाला वर मागण्यास सांगितले. माता म्हणाल्या, “तुम्ही तिन्ही मला पुत्ररूपाने प्राप्त व्हावे.” त्रिदेवांनी “तथास्तु” म्हटले आणि दिव्य वरदान पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

देवतांचे अंश अनुसूया मातेच्या गर्भातून प्रकट

ब्रह्माच्या अंशातून – चंद्र, महादेवाच्या अंशातून – दुर्वासा ऋषी, विष्णूच्या अंशातून – दत्तात्रेय. दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे संयुक्त अवतार मानले जातात. विष्णूंच्या प्रसादातून जन्मलेले दत्त भगवान हे ज्ञान, योग, संन्यास आणि करुणा यांचे सजीव स्वरूप आहेत. त्यांच्या जन्मदिवसाचाच अत्यंत उत्सव दत्तजयंती आजही भक्तिभावाने साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com