टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर हरभजन सिंगला आम आदमी पक्षाकडून राज्यसभेचे उमेदवार बनवण्यात आले आहे. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाने माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला (Harbhajan Singh) राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे 'आप' च्या विश्वसनीय सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचवेळी, सूत्रांच्या माहितीनुसार, हरभजन सिंगला पंजाबमधील क्रीडा विद्यापीठाचा प्रमुख बनवण्याची चर्चाही जोर धरु लागली आहे. (Cricketer Harbhajan Singh has been nominated for the Rajya Sabha by the Aam Aadmi Party)
दरम्यान, भगवंत मान यांच्या निवडीबद्दल हरभजन सिंगने ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले होते. आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि माझे मित्र भगवंत मान (Bhagwant Mann) आमचा नवा मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन, असे त्याने म्हटले होते. शहीद भगतसिंग यांच्या खटकरकलन गावात ते नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे ऐकून खूप आनंद झाला असल्याचे देखील त्याने म्हटले होते.
गेल्या वर्षी सिद्धूसोबतचा फोटो समोर आला होता
प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजन सिंग राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. पंजाब काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांच्या वतीने एक फोटो ट्विट करण्यात आला होता. भज्जीसोबतचा फोटो शेअर करताना सिद्धूने या फोटोस शक्यतांनी भरलेला फोटो म्हटले आहे.
यापूर्वी हरभजन सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यानंतर स्वतः हरभजन सिंगला पुढे यावे लागले होते. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा फेटाळून लावत त्याने सोशल मीडियावर सुरु असलेल्या अफवा खोट्या असल्याचं म्हटलं होतं. याआधी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत हरभजनने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चाही जोर धरु लागली होती, मात्र असे काहीच घडले नाही.
शिवाय, सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंग म्हणाला होता की, ''मला पंजाबची सेवा करायची आहे. एकतर राजकारणातून किंवा अन्य मार्गाने. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अनेक पक्षांमध्ये जाण्याच्या ऑफर आहेत.'' परंतु विचार करुनच कोणत्या पक्षात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.