पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आप नेते भगवंत मान यांनी घेतली शपथ

आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी बुधवारी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
Bhagwant Mann
Bhagwant MannDainik Gomantak
Published on
Updated on

आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी बुधवारी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. खटकर कलान गावात आयोजित एका भव्य समारंभात पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी भगतसिंगांचे गाव बसंती रंगात रंगले होते. विशेष म्हणजे तिथे पोहोचलेल्या बहुतांश लोकांनी बसंती पगडी आणि बसंती रंगाचा दुपट्टा परिधान केला होता. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह दिल्ली सरकारचे सर्व मंत्री उपस्थित होते. (AAP leader Bhagwant Mann has been sworn in as the 17th Chief Minister of Punjab)

दरम्यान, भगवंत मान (Bhagwant Mann) आपल्या भाषणातून म्हणाले, 'मी पंजाबच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांचे अभिनंदन करतो, इथे आल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि त्यांचे मंत्रीमंडळ शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहे.'

ते पुढे म्हणाले, 'खटकर कलान माझ्यासाठी नवीन नाही. ज्यांनी आम्हाला मतदान केले नाही, त्यांच्याबद्दलही माझी तक्रार नाही. हे संपूर्ण पंजाबचे सरकार आहे. शहीद आझम भगतसिंग म्हणत असत की, 'प्रेम करण्याचा सर्वांचा हक्क आहे. दिल्ली मॉडेलच्या आधारावर आम्ही पंजाबमध्ये रुग्णालये आणि शाळा बांधू.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Girl Dancing In Moving Local Train
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com