दिल्लीच्या शाहीन बागेत NCB ची मोठी कारवाई; 50 किलो हेरॉईन व 30 लाख रुपये केले जप्त

कारवाईतील हेरॉईन अफगाणिस्तानातून आल्याची एनसीबी ने व्यक्त केली शक्यता
Heroin
HeroinDainik Gomantak
Published on
Updated on

एनसीबीच्या दिल्ली युनिटने शाहीन बागच्या जामिया मोठी कारवाई केली असुन नगरमध्ये 50 किलो हेरॉईन आणि 47 किलो संशयित नार्को जप्त केले आहे. तसेच एका घरातून 30 लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याचे मशीनही सापडले आहे. याबाबत दिल्ली उत्तर विभागाचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, या सर्व वस्तू ज्यूटच्या पिशव्या आणि इतर पिशव्यांमध्ये बंडल करण्यात आल्या होत्या. (NCB's big action in Delhi's Shaheen Bagh )

Heroin
मुंबईत गेल्या पाच दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 56 टक्क्यांनी वाढ

सिंह म्हणाले की, आम्ही आतापर्यंत या कारवाईत एका व्यक्तीला अटक केली आहे. तसेच यामागे एका आंतरराष्ट्रीय संघटनेचा हात असून लवकरच त्याचा पर्दाफाश करू असे ही ते म्हणाले. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, हे हेरॉईन अफगाणिस्तानातून आले होते, तर रोकड हवालाद्वारे आणण्यात आली होती. सागरी मार्गाने आणि सीमेवरून अमली पदार्थ आणले जात होते. हेरॉईन पॅक करून फ्लिपकार्टच्या पॅकिंगमध्ये आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेरॉईन झाडाच्या फांदीत पोकळी बनवून समुद्रात आणि नंतर पाकिस्तान सीमेवरून लपवून भारतात आणले होते.

Heroin
भोंगा वादात अमृता फडणवीसांची उडी; ठाकरे सरकारवर साधला निशाणा

या हेरॉईनचा दर्जा नुकताच अटारी येथून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांसारखाच आहे. आता एनसीबी विविध शहरांमध्ये छापे टाकून या आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. यामागे इंडो-अफगाण सिंडिकेटचा हात असल्याचे एएनसीबीने चौकशीनंतर उघड केले आहे. पंजाब, यूपी, दिल्ली आणि हरियाणामध्ये अमली पदार्थांचा पुरवठा केला जात होता. या खुलाशानंतर एनसीबीने तेथेही छापे टाकले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com