Corona In India: कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय झपाट्याने वाढ! तीन राज्यात मास्क अनिवार्य, आता...

Corona In India: देशातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता अनेक राज्यांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत.
Corona
CoronaDainik Gomantak
Published on
Updated on

Corona In India: देशातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता अनेक राज्यांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. या राज्यांमध्ये, दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागात, सरकारने मास्क घालणे अनिवार्य केले आहे.

अशा परिस्थितीत, लवकरच दिल्लीतही मास्क अनिवार्यपणे घालण्याचे दिवस परत येण्याची शक्यता आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,038 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 21,179 झाली आहे.

आकडेवारीनुसार, सोमवारी दिल्ली (Delhi) आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचवेळी, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये 1-1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा 5,30,901 वर पोहोचला आहे.

Corona
Watch Video: बंगालमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार, हुगळीत मिरवणुकीत दोन गटांमध्ये हाणामारी आणि जाळपोळ

मास्कबाबत नवीन नियम काय आहेत?

हरियाणाच्या मनोहर लाल खट्टर सरकारने राज्यातील 100 हून अधिक लोकांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे.

म्हणजेच 100 पेक्षा जास्त लोकांचा मेळावा असेल त्या ठिकाणी मास्क लावणे आवश्यक आहे. याशिवाय, राज्यातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व लोकांना मास्क घालावे लागणार आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय सर्दी-खोकला असलेल्या रुग्णांना अनिवार्यपणे तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Corona
दिल्लीत हनुमान जयंती मिरवणुकीत हाणामारी, शाहांनी पोलिस अधिकाऱ्यांशी केली चर्चा

तसेच, महाराष्ट्रात (Maharashtra) सरकारने सातारा जिल्ह्यातील सरकारी कार्यालये आणि ट्रस्ट कार्यालये तसेच महाविद्यालये आणि बँकांमध्ये मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

तमिळनाडू सरकारनेही 1 एप्रिलपासून रुग्णालयांमध्ये सतत वाढणारी प्रकरणे पाहता मास्क अनिवार्य केले आहेत. सध्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 21,179 आहे ज्यांवर उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com