Goa Crime: गोव्यात हैद्राबादच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिसवाडी येथून एकाला अटक
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime: गोव्यात हैद्राबादच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिसवाडी येथून एकाला अटक

Goa Crime News: अटक संशयित तरुणाने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच, शिवीगाळ केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
Published on

Goa Crime News

पणजी: हैद्राबादच्या तरुणीवर गोव्यात लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिसवाडी येथून २२ वर्षीय तरुणाला पणजी पोलिसांनी अटक केलीय. जुलै ते डिसेंबर २०२४ या काळात ही घटना घडली. जीव मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने दिली आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन तिसवाडी येथून पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. जुलै ते १४ डिसेंबर २०२४ याकाळात ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटलंय. अटक संशयित तरुणाने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच, शिवीगाळ केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

Goa Crime: गोव्यात हैद्राबादच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिसवाडी येथून एकाला अटक
Cash For Job: गोव्यातील भाजप सरकारच्या बदनामीचा कट? पत्रकाराने 'Toolkit' चा Screenshot शेअर केला

लैंगिक अत्याचाराची माहिती घरच्यांना देणार, असे पीडित तरुणीने सांगितल्यावर संशयित तरुणाने तिला जबर मारहाण केली, असेही दाखल तक्रारीत म्हटलं आहे. पोलिस उपनिरीक्षक रश्मिका कवळेकर प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com