Randeep Surjewala Pegasus Spyware PM Modi
Randeep Surjewala Pegasus Spyware PM ModiDainik Gomantak

मोदींनी केले 'लोकशाहीचे अपहरण'; रणदीप सुरजेवाला

माजी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्र्यांची ही केली हेरगिरी. पेगासस स्पायवेअर ने टारगेट केलेल्या यादीत वकील, कार्यकर्ते आणि अगदी पत्रकार प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यम सुध्दा आहेत.
Published on

काँग्रेसने पेगासस डीलच्या खुलाशावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मोदी सरकारने लोकशाहीला ओलीस ठेवले असून मोदी सरकारचे हे काम देशद्रोहाचे काम केले आहे.काँग्रेस (Congress) प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, हे स्पष्ट आहे की सरकारने मागच्या वेळेस संसदेत जी माहीती दिली तेव्हा ते खोटे बोलले. ते संसदेत खोटे बोलले म्हणजे देशातील जनतेची फसवणूक केली. काँग्रेस नेते म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) यासंदर्भात तात्काळ दखल घ्यायला लावून दंडात्मक कारवाई करण्याचे सांगणार आहोत.

Randeep Surjewala Pegasus Spyware PM Modi
'मोदी सरकारने केला देशद्रोह'

असे करणे म्हणजे 'लोकशाहीचे अपहरण' आणि 'देशद्रोहाचे कृत्य' आहे.

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेस हे बर्‍याच दिवसांपासून म्हणत आहे, "इस्रायली पाळत ठेवणाऱ्या स्पायवेअर पेगाससच्या (Pegasus) बेकायदेशीर आणि असंवैधानिक हेरगिरी रॅकेटचे सूत्रधार हे मोदी सरकार आहे. तसेच यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) हात आहे!" हे निर्लज्जपणे केलेले 'लोकशाहीचे अपहरण' आणि 'देशद्रोहाचे कृत्य' आहे.देशाचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि आयटी मंत्री यांनी पेगाससच्या मुद्द्यावरून देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसने ने केला आहे.

सुरक्षा फीचर्स हॅक करण्यास सक्षम

सुरजेवाला म्हणाले की, स्पायवेअर पेगासस केवळ व्हॉट्स अॅपसह फोनचीच सुरक्षितता तोडत नाही तर फोनच्या सर्व सुरक्षिततेशिवाय फोनच्या आसपासच्या सर्व हालचाली टिपण्यासाठी सेलफोन कॅमेरा आणि मायक्रोफोनमध्ये प्रवेश करण्यास सक्षम आहे. तसेच हॅक करण्या शिवाय पासवर्ड, कॉन्टॅक्ट लिस्ट, टेक्स्ट मेसेज तसेच व्हॉईस कॉल ऐकणे आणि पाठवलेले मेसेज कॅप्चर करण्यास देखील पेगासस सक्षम आहे. लोकांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी ते सेल फोनमध्ये बनावट कंटेट देखील लावू शकते.

माजी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्र्यांची ही केली हेरगिरी

राहुल गांधी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची हेरगिरी करण्यासाठी मोदी सरकारने पेगासस स्पायवेअरचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. या स्पायवेअरचा वापर माजी पंतप्रधान देवेगौडा, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी, भाजपच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, भाजपचे कॅबिनेट मंत्री प्रल्हादसिंग पटेल, त्यांची पत्नी आणि कर्मचारी, विद्यमान इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि त्यांच्या पत्नी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या संदर्भात झाल्याचे काँग्रेस ने म्हटले आहे झाले. याशिवाय प्रवीण तोगडिया आणि अन्य नेत्यांचीही हेरगिरी करण्यात आली असेही काँग्रेस ने म्हटले.

Randeep Surjewala Pegasus Spyware PM Modi
"मोदी सरकारने जनतेला त्रास देण्याचा मोठा विक्रम केला"

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी असाही दावा केला की, एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, निवडणूक आयोग (Election Commission), सीबीआय (Cbi) संचालक आलोक वर्मा यांचे कुटुंब, बीएसएफ प्रमुख केके शर्मा, बीएसआय आयजी जगदीश मैथनी, रॅा (RAW) अधिकारी जितेंद्र कुमार ओझा आणि त्यांची पत्नी, भारतीय लष्कराचे अधिकारी - कर्नल मुकुल देव आणि कर्नल अमित कुमार यांनाही पेगाससने लक्ष्य केले आहे.

मीडिया हाऊस सुध्दा टार्गेटवर

काँग्रेसचा आरोप आहे की, पेगासस स्पायवेअर ने टारगेट केलेल्या यादीत वकील, कार्यकर्ते आणि अगदी पत्रकारांचा सुध्दा समावेश आहे. शिवाय प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यम सुध्दा आहेत.

गृहमंत्री आणि गृह मंत्रालयाने आरटीआयच्या उत्तरात पेगासस खरेदी करण्यास नकार देऊन भारतातील लोकांचा विश्वासघात केला. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पेगाससच्या वापराला "निराधार" आणि "अत्यंत सनसनाटी" असे संबोधून आधीच्या अहवालावर हल्ला केला होता असेही काँग्रेसने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com