'मोदी सरकारने केला देशद्रोह'

'मोदी सरकारने आमच्या लोकशाही संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगासस विकत घेतले. फोन टॅप करुन सत्ताधारी पक्ष, विरोधक, सेना, न्यायव्यवस्था या सर्वांनाच टार्गेट केले आहे. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे.'
Narendra Modi & Benjamin Netanyahu
Narendra Modi & Benjamin NetanyahuDainik Gomantak
Published on
Updated on

इस्रायली स्पायवेअर पेगासस (Pegasus spyware) आणि मिसाइल प्रणाली हे 2017 मध्ये भारत आणि इस्रायलमध्ये झालेल्या सुमारे $2 अब्ज शस्त्रास्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या कराराचे 'केंद्र' होते. अमेरिकेतील दैनिक 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने आपल्या एका बातमीत हा दावा केला आहे. गेल्या वर्षी भारतासह काही सरकारांनी पत्रकार, मानवाधिकार रक्षक, राजकारणी आणि नागरिकांची हेरगिरी करण्यासाठी एनएसओ ग्रुपच्या पेगासस सॉफ्टवेअरचा कथितपणे वापर केला तेव्हा हा वाद निर्माण झाला. यामुळे गोपनीयतेच्या अधिकाराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. (Rahul Gandhi Said That The Modi Government Bought Pegasus To Spy On The People)

दरम्यान, यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'मोदी सरकारने (Modi Government) आमच्या लोकशाही संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगासस विकत घेतले. फोन टॅप करुन सत्ताधारी पक्ष, विरोधक, सेना, न्यायव्यवस्था या सर्वांनाच टार्गेट केले आहे. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे.'

Narendra Modi & Benjamin Netanyahu
CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितले मुस्लिमांना तिकीट न देण्यामागचे कारण

तसेच, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करत म्हटले की, "मोदी सरकार भारताच्या शत्रूंसारखे का वागले. भारतीय नागरिकांविरुद्ध युद्धाची शस्त्रे का वापरली? पेगासस वापरुन बेकायदेशीर हेरगिरी देशद्रोहाच्या श्रेणीत येते. कोणीही कायद्याच्या वर नाही आणि न्याय मिळेल याची खात्री आम्ही करु.''

शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले की, 'स्पायवेअरचा वापर नागरिकांच्या संरक्षणासाठी होत नाही. तर विरोधी पक्ष आणि पत्रकारांची हेरगिरी करण्यासाठी सरकारकडून केला गेला. भाजप है तो मुमकिन है, देश बिग बॉस शोमध्ये बदलला आहे.'

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, 'भारतीय करदात्यांच्या पैशाचा वापर भारतीयांची हेरगिरी आणि पाळत ठेवण्यासाठी होतो! स्वत:च्या देशवासीयांवर लक्ष ठेवण्यासाठी, देशाला बिग बॉस स्टुडिओमध्ये रुपांतरित करण्यासाठी कष्टाचे पैसे खर्च केले जात आहेत. शेजारील देशांनी आपला प्रदेश व्यापू नये, यासाठी हे तंत्र वापरता आले असते पण अरेरे!'

Narendra Modi & Benjamin Netanyahu
Lakhimpur Kheri Case: 'योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा'

काँग्रेसचे प्रवक्ते शमा मोहम्मद म्हणाले की, भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक भारतीय नागरिकांविरुद्ध पेगासस या स्पायवेअर वापर केला, ज्यासाठी त्यांना जबाबदार धरले पाहिजे.

तसेच, केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय आणि संसदेची दिशाभूल करत असल्याचा आरोप राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल यांनी केला आहे.

त्यांनी ट्विट करुन म्हटले की, 'नरेंद्र मोदी गप्प का आहेत? याबाबत स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी पीएमओची आहे. न्यू यॉर्क टाईम्सने आज उघड केले आहे की, त्यांनी पेगासस, इस्रायली NSO कंपनीने विकले जाणारे स्पायवेअर, करदात्यांची 300 कोटी रुपये देऊन प्रत्यक्षात विकत घेतले. याचा अर्थ आमच्या सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि संसदेची दिशाभूल केली.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com