Congress News: 'सोनिया गांधींशी सहमत नाही', राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवर काँग्रेस संतप्त

Congress News: काँग्रेसने तर सोनिया गांधींच्या मताशी पक्ष सहमत नसल्याचे म्हटले आहे.
Abhishek Singhvi
Abhishek Singhvi Dainik Gomantak
Published on
Updated on

Congress On Supreme Court Order: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींच्या सुटकेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (11 नोव्हेंबर) दिला. मात्र दोषींच्या सुटकेवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने सोनिया गांधींच्या मताशी पक्ष सहमत नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रश्न उपस्थित केला.

सिंघवी म्हणाले की, "सोनिया गांधी यांना त्यांचे मत देण्याचा अधिकार आहे, परंतु मी आदरपूर्वक सांगतो की, पक्ष त्यांच्या मताशी सहमत नाही. ते त्यांनाही स्पष्टपणे कळविण्यात आले आहे." सिंघवी यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "या प्रकरणी आमच्याकडे जो काही पर्याय असेल तो आम्ही वापरु. आम्ही राजीव गांधींचे (Rajiv Gandhi) बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही."

Abhishek Singhvi
Sonia Gandhi Mother Death: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मातोश्रींचे निधन

सिंघवी यांनी न्यायालयात दाद मागितली

अभिषेक मनू सिंघवी पुढे म्हणाले की, "दोषींना सोडू नये, अशी आमची न्यायालयाला (Court) विनंती आहे. माजी पंतप्रधानांची हत्या हा भारताच्या अस्तित्वावरचा हल्ला आहे. यात राजकारणाचा रंग नाही. अशा प्रकरणात आत्तापर्यंत कुणालाही सोडण्यात आलेले नाही."

सिंघवी पुढे म्हणाले की, 'पंतप्रधानांवर हल्ला हा सामान्य गुन्हा असू शकत नाही. राज्य सरकार दोषींना पाठीशी घालत होते. त्यामुळे न्यायालयाला असा निर्णय द्यावा लागला. राज्य सरकारच्या मताशी केंद्र सरकारने असहमती दर्शवली.'

Abhishek Singhvi
काय आहे नॅशनल हेराल्डचे प्रकरण, ज्यात अडकले सोनिया गांधी अन् राहुल गांधी

"न्यायिक यंत्रणेने भावनांची दखल घेतली नाही"

शेवटी सिंघवी म्हणाले की, "आमच्या न्यायव्यवस्थेने लोकांच्या भावनांची दखल घेतली नाही. अशा जघन्य गुन्हेगारांच्या सुटकेला काँग्रेसचा (Congress) विरोध आहे. भारतीय तुरुंगात लाखो लोक आहेत, जे गुन्ह्याशिवाय बंद आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन तुम्ही गुन्हेगारांची सुटका करत आहात."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com