Chhattisgarh काँग्रेसमध्ये गोंधळ, टीएस सिंह देव यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा

Congress Leader Ts Singh Deo: छत्तीसगड काँग्रेसमध्ये राजकीय गोंधळ सुरु झाला आहे.
Congress Leader Ts Singh Deo
Congress Leader Ts Singh DeoDainik Gomantak
Published on
Updated on

Chhattisgarh Congress: छत्तीसगड काँग्रेसमध्ये राजकीय गोंधळ सुरु झाला. राज्यातील पक्षाचे दिग्गज नेते आणि बघेल मंत्रिमंडळातील मंत्री टीएस सिंह देव यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. टीएस सिंह देव यांनी पंचायत आणि ग्रामविकास मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, छत्तीसगड काँग्रेसमध्ये (Congress) टीएस सिंह देव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यातील संघर्ष जुना आहे. हायकमांडने त्यांना अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अडीच वर्षे पूर्ण होऊनही सिंह देव यांना दिलेले आश्वासन हायकमांडने पाळले नसल्याचे टीएस सिंह देव यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

Congress Leader Ts Singh Deo
Chhattisgarh: नक्षलवाद्यांकडून नारायणपूरमध्ये IED स्फोट; एक जवान शहीद

दुसरीकडे, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर टीएस सिंहदेव म्हणाले, 'लोकांच्या अपेक्षेनुसार मी काम करु शकत नाही, असे मला वाटू लागले होते. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. मी माझ्या पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. मी नुकतेच माझे मंत्रीपद सोडले आहे.'

तसेच, टीएस सिंह देव यांच्या राजीनाम्यानंतर छत्तीसगड (Chhattisgarh) काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. सिंह देव यांनी शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांना 4 पानी राजीनामा पत्र पाठवले होते. माजी पंचायत मंत्री सिंह देव यांच्या दाव्यानुसार, मुख्य सचिव अमिताभ जैन यांनी मुख्यमंत्री समग्र ग्रामीण विकास योजनेअंतर्गत सचिवांची समिती स्थापन करुन आपली मक्तेदारी प्रस्थापित केली आहे. या समितीमार्फत सर्व प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिली जात होती.

Congress Leader Ts Singh Deo
Chhattisgarh: नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह देव हे विभागात आपल्या आदेशाचे पालन होत नसल्यामुळे नाराज होते. मात्र त्यांनी आरोग्य विभागाचा राजीनामा दिलेला नाही. टीएस सिंह देव यांची ही नाराजी चव्हाट्यावर आल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com