Shashi Tharoor: गुजरात दंगलीबाबत काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याचे मत
Shashi Tharoor
Shashi TharoorDainik Gomantak

Shashi Tharoor On BBC Documentary: बीबीसीच्या 'इंडिया : द मोदी क्वश्चन' या डॉक्युमेंटरीवरून देशातील वाद वाढतच चालला आहे. आता या वादात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी उडी घेतली आहे.

त्यांनी बीबीसीच्या माहितीपटाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे, त्यामुळे आता इतर विषयांवर बोलण्याची गरज असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.

Shashi Tharoor
BBC Documentary : बीबीसी डॉक्युमेंटरी म्हणजे भारताविरुद्ध दुर्भावनापूर्ण कृत्य; राज्यपाल श्रीधरन पिल्लई

थरूर म्हणाले की गुजरात दंगलीच्या जखमा अद्याप पूर्णपणे भरल्या नाहीत, परंतु या विषयावर चर्चा करून काही फायदा होणार नाही. भारत या शोकांतिकेतून पुढे गेला आहे आणि लोकांना असे वाटते की हे प्रकरण मागे ठेवले पाहिजे, कारण आता दोन दशके उलटली आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानेही आपला निर्णय दिला आहे.

आता यापासून पुढे गेले पाहिजे. मात्र, अधिकृत तपासात संपूर्ण सत्य समोर आलेले नाही, असे मानणाऱ्यांबाबतही माझा आक्षेप नाही.

अशोक सिंग नावाच्या एका ट्विटर युजरने थरूर यांना ट्विटरवरून विचारले होते की, 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटीश सरकारने माफी मागावी अशी मागणी थरूर यांनी केली होती. आणि आता मात्र ते भारतीयांना 2002 च्या गुजरात दंगलीचा विषय सोडून पुढे जायला सांगत आहेत. दरम्यान, त्यावर थरूर यांनी मी असे केलेले नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे.

Shashi Tharoor
JNU-Jamia नंतर डीयूमध्ये गोंधळ, कॅम्पसमध्ये कलम 144 लागू; 24 विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शशी थरूर म्हणाले, "माझ्या विचारांशी इतर लोक असहमत असू शकतात हे मला मान्य आहे, परंतु जातीय मुद्द्यांवर आणि गुजरात दंगलग्रस्तांसाठी दोन दशके मी उभा राहिलेलो आहे. या माझ्या रेकॉर्डचा विपर्यास करणे अत्यंत चुकीचे आहे.

मी वारंवार हे स्पष्ट केले आहे की गुजरातच्या जखमा पूर्णपणे भरल्या नाहीत, असे मला वाटते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला आहे, परंतु चर्चेचा फारसा उपयोग नाही... इतर खूप मुद्दे आहेत ज्याबद्दल बोलणे आवश्यक आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com