BBC Documentary : बीबीसी डॉक्युमेंटरी म्हणजे भारताविरुद्ध दुर्भावनापूर्ण कृत्य; राज्यपाल श्रीधरन पिल्लई

गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंटरीचा तीव्र निषेध केला आहे
Goa Governor Statement on BBC Documentary
Goa Governor Statement on BBC Documentary Dainik Gomantak
Published on
Updated on

BBC Documentary On Modi : भारतात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीवरुन गदारोळ सुरु आहे. यातच गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंटरीचा तीव्र निषेध केला आहे आणि ते दुर्भावनापूर्ण कृत्य असून देशाचा अपमान असल्याचे मत व्यक्त आहे.

Goa Governor Statement on BBC Documentary
Smart City Panjim: ...यामुळे पणजीतील कामे 15 मार्चनंतर बंद

पंतप्रधानांचे चारित्र्यहनन हे राज्य आणि आपल्या राष्ट्राविरूद्ध अपमानास्पद आणि दुर्भावनापूर्ण कृत्य आहे, म्हणूनच मी असे म्हणू इच्छितो की बीबीसीचा हा प्रयत्न चांगला नाही. ते पुढे म्हणाले बीबीसी हे स्वतंत्र नसून ते ब्रिटिश संसदेला उत्तरदायी आहे.

देशाचा कायदा सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व प्रदान करतो. राजकीय मतभेद असूनही आपण एकत्रितपणे एक राष्ट्र म्हणून, आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर हल्ला करण्याचा किंवा ते नष्ट करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाचे रक्षण करण्यास सक्षम असले पाहिजे. अशा प्रयत्नांना योग्य उत्तर दिले पाहिजे.

सार्वभौमत्व नेहमीच सर्वोच्च आणि निरपेक्ष असते. ती एक अनियंत्रित शक्ती आहे, ज्याद्वारे स्वतंत्र राज्य शासित होते. आपल्या लोकशाहीतील विविधता आणि जिवंतपणाचे जगभरात कौतुक होत असते. ते पुढे म्हणाले की काही G20 कार्यक्रम आयोजित करण्यासाठी गोव्याची निवड करण्यात आली आहे आणि यामुळे राज्याला त्याची समृद्ध संस्कृती आणि आदरातिथ्य दर्शविण्याची संधी मिळेल.

देशातील सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ असलेल्या राज्यातील हा कार्यक्रम गोव्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल, असा मला विश्वास आहे. गोव्याची अर्थव्यवस्था सुरक्षित आहे आणि जीडीपीच्या बाबतीत राज्य पहिल्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com