Pateriya Comment On PM Modi: PM मोदींच्या हत्येसंबंधी आवाहन करणाऱ्या काँग्रेस नेत्याविरुध्द FIR दाखल

Raja Pateriya controversial comment: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री राजा पटेरिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

Raja Pateriya Controversial Remarks On PM Modi: मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री राजा पटेरिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, संविधान, अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासींचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर पंतप्रधान मोदींना मारायला तयार व्हा, असे वादग्रस्त वक्तव्य पटेरिया यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन गदारोळ झाला आहे. आता पटेरिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याविरुध्द आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आपले म्हणणे चुकीच्या पध्दतीने मांडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे.

PM Narendra Modi
Watch Video: पंतप्रधान मोदींच्या हत्येसाठी तयार राहा; टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

तसेच, काँग्रेस नेते राजा पटेरिया यांच्या वक्तव्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, 'काँग्रेसचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याशी मैदानात स्पर्धा करु शकत नाहीत, म्हणूनच काँग्रेसचा एक नेता त्यांना मारण्याची भाषा करत आहे. ही द्वेषाची पराकाष्ठा आहे.'

दुसरीकडे, पटेरिया यांच्या वक्तव्यावर त्यांनी ट्विट करत म्हटले की, 'भारत जोडो यात्रेत सामील असणाऱ्यांचे वास्तव समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांच्या हृदयात वसले आहेत. काँग्रेसचे (Congress) लोक त्यांच्याशी मैदानात मुकाबला करु शकत नाहीत, म्हणूनच त्यांना मारण्याची भाषा करत आहेत.'

PM Narendra Modi
ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना दिलीप घोष यांची जीभ घसरली  

पाटरियावर गुन्हा दाखल

त्याचवेळी, पटेरिया यांच्या वक्तव्यावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, 'ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही. ही इटलीची काँग्रेस आहे आणि इटलीची मानसिकता मुसोलिनीची राहिली आहे. स्वरा भास्कर, कन्हैया कुमार त्यांच्या प्रवासात ज्या मार्गाने चालत आहेत, त्यावरुनही स्पष्ट होते. पटेरिया यांनी पीएम मोदींविरोधात केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह विधानासाठी मी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश देत आहे.' नरोत्तम मिश्रा यांच्या सूचनेनंतर, मध्य प्रदेशातील पन्ना येथील पोलिसांनी शांतता बिघडवणे आणि असंतोष पसरवल्याबद्दल पटेरिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

PM Narendra Modi
'लसीकरणाचे उद्दिष्ठ पूर्ण करा नाही तर फासावर लटकवेन' जिल्हाधिकाऱ्यांची जीभ घसरली

पाटरिया काय म्हणाले?

पटेरिया यांचे हे वक्तव्य सकाळपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगत आहेत की, 'मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर (लोकांमध्ये) फूट पाडतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे भविष्य धोक्यात आले आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींना मारायला तयार व्हा. मारणे म्हणजे पराभूत करण्याचे काम करा.' मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पवई येथील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com