पेगासस (Pegasus) हेरगिरीच्या वादावरून कॉंग्रेसने (Congress) मोदी सरकारवर जोरदार टीका केल्याचे पहायला मिळते आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, मोदी सरकार कायदा आणि घटनेची हत्या करत आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला असुन हा प्रकार म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेसह खेळ सुरु असल्यासारखे आहे. मोदी सरकार बेडरूमची चर्चा ऐकत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. (Congress has criticized Modi government over pegasus issue)
या प्रकरणावर बोलताना सुरजेवाला म्हणाले की, "राहुल गांधींसह अनेक राजकारणी आणि पत्रकारांची हेरगिरी करण्यात आली आहे. भाजपचे नाव भारतीय स्पाय पार्टी असे ठेवले पाहिजे. सुरक्षा खात्यांच्या प्रमुखांवरदेखील हेरगिरी होत असल्याचे अहवालात दिसते आहे.”
कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा आणि पंतप्रधानांच्या या प्रकरणातील भूमिकेची सुद्धा चौकशी केली पाहिजे. आम्ही हा संपूर्ण विषय संसदेत उपस्थित करणार आहोत. त्याचवेळी अधीर रंजन चौधरी म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी डिजिटल इंडियाबद्दल बोलतात मात्र हा तर सर्विलन्स (पाळत ठेवणारे) इंडिया आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे याविरोधात संसदेत आवाज उठवतील.’
कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर, 'पेगाससच्या माध्यमातून हेरगिरीशी संबंधित खुलासे अत्यंत घृणास्पद प्रयत्न दर्शवत आहेत. जर हे सत्य असेल तर घटनेद्वारे देशवासीयांना देण्यात आलेल्या गोपनीयतेच्या अधिकारावर मोदी सरकार धोकादायक हल्ला करीत आहे. ही बाब लोकशाही साठी धोकादायक आहेच मात्र यामुळे देशातील नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे देखील नुकसान होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.