संसदेचे पावसाळी आधिवेशन (Monsoon Session) आजपासुन सुरु झाले असुन आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ झाला. कॉंग्रेस(Congress) , तृणमुल कॉंग्रेस (TMC), बसपा (BSP) आणि अकाली दलाच्या खासदारांनी महागाई, शेतकरी आंदोलन आणि इतर प्रश्नांवरुन संसदेत जोरदार घोषणाबाजी करत हौदात उतरले होते. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे त्यांच्या मंत्री मंडळातील नव्या सदस्यांची ओळख करुन देऊ शकले नाहीत. (Opposition to inflation in the Monsoon session of Parliament)
लोकसभेत झालेल्या या गोंधळानंतर दुपारी अडीचपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर अभिनेता दिलीप कुमार आणि मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर राज्यसभेलाही कामकाज एक तासासाठी तहकूब करावे लागले. लोकसभेतील मंत्र्यांच्या परिचयादरम्यान झालेल्या गोंधळाबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, काही लोकांना खूप त्रास होत आहे कारण आज या सदनात महिला मंत्री झाल्या आहेत आणि त्यांची ओळख करून दिली जात आहे. ही स्त्री-विरोधी मानसिकता का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
बऱ्याच दिवसांनंतर संसदेच्या या अधिवेशनात विरोधी पक्षांनी महागाई, कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन या मुद्दय़ांवर सरकारला घेराव घालण्याची रणनीती तयार केली. त्याचबरोबर संसद अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगासस स्पायवेअरद्वारे फोन हॅक केल्याच्या प्रकरणामुळेही सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. सरकार संसदेच्या या अधिवेशनात सुमारे 30 विधेयक पास करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये वीज दुरुस्ती विधेयकासारखे महत्त्वाचे विधेयक सुद्धा आहेत. संसदेच्या अधिवेशनाच्या एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की सरकार प्रत्येक विषयावर चर्चेसाठी तयार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.