CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

Ashutosh Ranka CJP press conference: ‘‘देशात गेल्या ७२ तासांत अशा घटना घडल्या की ज्याची कल्पना केली जाऊ शकत नाही. एकप्रकारे आणीबाणीपेक्षाही भयावह अवस्था सध्या देशात आहे,’’ असा हल्लाबोल कॉक्रोच जनता पक्षाचे नेते आशुतोष रांका यांनी केला.
Ashutosh Ranka CJP press conference
Ashutosh Ranka CJP press conferenceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: ‘‘देशात गेल्या ७२ तासांत अशा घटना घडल्या की ज्याची कल्पना केली जाऊ शकत नाही. एकप्रकारे आणीबाणीपेक्षाही भयावह अवस्था सध्या देशात आहे,’’ असा हल्लाबोल कॉक्रोच जनता पक्षाचे नेते आशुतोष रांका यांनी केला. केंद्र सरकार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करतानाच स्वतःसह अभिजित दीपके आणि सौरभ दास यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या पोलिसांच्या कारवाईवरही रांका यांनी पत्रकार परिषद घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘‘आमची लढाई ही निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात होती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी ही लढाई त्यांच्या दिशेने वळवून घेतली आहे. देशाला वाचवणे आणि पुढे नेण्याऐवजी ज्ञानेश कुमार भाजपला जिंकून आणण्यासाठी काम करीत आहेत. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा भित्रा पंतप्रधान देशाने आजवर पाहिलेला नाही. दोन दिवसात देशाची जी बदनामी झाली त्यासाठी मोदी जबाबदार आहेत. दोन दिवसांत हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलनकर्त्यांना मारहाण करण्यात आली. मोदी आणि शहा यांनी देशातील परिस्थिती बिघडवून टाकली आहे,’’ असे आरोप ‘सीजेपी’च्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

Ashutosh Ranka CJP press conference
CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

‘लाखो लोकांना त्रास’

आणीबाणीविषयी आम्ही आमच्या आई-वडिलांकडून ऐकले होते. ती नेमकी काय असते ते पहावयास मिळाले. १९७५ मध्ये रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र गत शनिवारी रेल्वे, मेट्रो बंद करत लाखो लोकांना त्रास देण्यात आला, असे रांका म्हणाले. ‘‘दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याचे आम्ही पोलिसांना सांगितले तेव्हा त्यांनी लाजिरवाणे कृत्य केले. पोलिसांच्या हातात त्यावेळी कॅमेरा होता. माझ्या कुटुंबातील सदस्य पटकन घाबरून जातात. त्यांना हृदयरोग आहे. मला चुलत्यांशी बोलायचं आहे, असे दिपके वारंवार सांगत होते. पण पोलिसांनी त्याला बोलू दिले नाही. दिपके गावी गेले असले तरी ही लढाई थांबणार नाही,’’ असेही रांका यांनी सांगितले.

Ashutosh Ranka CJP press conference
CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

पोलिस छावणचे रूप

प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचा सामान्य जनतेला प्रचंड त्रास झाल्याचे सौरभ दास यांनी नमूद केले. ‘‘दिल्लीला एकप्रकारे पोलिसांची छावणी बनवण्यात आले. शहरात ३० ते ४० हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. एक प्रकारे ही खुली आणीबाणी म्हणावी लागेल. काही ठिकाणी सीमा सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले. तर काश्मीर, बंगाल आणि नक्षलग्रस्त भागातून सुरक्षा रक्षकांना दिल्लीत आणले गेले होते. हा तैनातीचा त्रास सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला,’’ असा दावाही दास यांनी केला. जाणूनबुजून रेल्वे आणि मेट्रो सेवा प्रभावित करण्याचे काम प्रशासनाने केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Ashutosh Ranka CJP press conference
CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

कार्यकर्त्यांना मारहाण

‘‘या सरकारचा अंत जवळ आला आहे. मोदी-शहा यांच्या सांगण्यावरून ‘सीजेपी’ कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. अशावेळी मानवाधिकार आयोग झोपले आहे काय? पोलिसांनी कार्यकर्त्यांची अटक नव्हे तर त्यांचे अपहरण केले होते. आमचे मोबाईल जप्त व हॅक करण्यात आले,’’ असा आरोपही दाय यांनी केला आहे.

शांतता भंग न करण्याच्या अटीवर नेत्यांची सुटका

एक वर्ष शांतता भंग न करण्याची अट घालत ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने कॉक्रोच जनता पक्षाचे(सीजेपी) नेते अभिजित दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची सुटका केली आहे. या तिघांच्या सुटकेच्या आदेशानंतर ‘कॉक्रोच कधी मरत नाहीत’ अशी प्रतिक्रिया ‘सीजेपी’ने समाज माध्यमातून दिली.

दिपके, दास आणि रांका यांना भारतीय न्याय संहितेतील कलम १२६ आणि १७० नुसार ताब्यात घेण्यात आले होते. दिल्ली छावणी परिसर येथील विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक वर्षांसाठी चांगली वर्तणूक आणि शांततेचा भंग न करण्याचा अटीवर त्यांना सोडण्याचे निर्देश दिले आहेत, असे पोलिसांनी समाज माध्यमांद्वारे सांगितले. दुसरीकडे गुरूग्रामच्या सेक्टर-५६ येथील घरातून ताब्यात घेण्यात आलेला यूट्यूबर ध्रुव राठी यालाही पोलिसांनी सोडले आहे. ‘‘पुन्हा जंतर मंतरवर जाण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,’’ असा इशारा राठी याला दिला आहे. तर, ‘‘मला अटक नव्हे माझे अपहरण करण्यात आले होते,’’ असा आरोप राठी याने केला आहे.

Ashutosh Ranka CJP press conference
CJP GenZ Protest: "GenZ म्हणजे गटर जनरेशन!" जंतर-मंतरवरील रील्स पाहून कंगना रणौतचा संताप; तरुण पिढीला सुनावले खडेबोल

गुन्हे दाखल

शनिवारच्या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २२ गुन्हे दाखल केले आहेत. कायदा व्यवस्था हातात घेणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ले करणे अशा कारणांसाठी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Supreme Court Delhi barricades
Gyanesh Kumar Resignation
Abhijeet Dipke Detained Delhi Airport
Gyanesh Kumar Resignation Demand Panaji
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com