CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Supreme Court Delhi barricades: कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) आंदोलनावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिल्ली प्रशासनाने शहरात सर्वत्र बॅरिकेड लावल्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली.
Supreme Court Delhi barricades
CJP Protest DelhiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) आंदोलनावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिल्ली प्रशासनाने शहरात सर्वत्र बॅरिकेड लावल्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली. नागरिकांना वावरण्याचे स्वातंत्र्य देणे आवश्‍यक आहे, असे सांगत न्यायालयाने रस्त्यांवर उभारण्यात आलेले सर्व बॅरिकेड आणि अडथळे हटविण्याचे निर्देश पोलिसांना दिले. मेट्रो, इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे निर्देशही देण्यात आले.

‘सीजेपी’चे शनिवारचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी मध्य दिल्लीत अभूतपूर्व बंदोबस्त लावला होता. प्रशासनाने मेट्रो आणि रेल्वे सेवा काही प्रमाणात बंद केली होती. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल करण्यात आली होती.

Supreme Court Delhi barricades
CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पणजीत रणकंदन; आझाद मैदानावर आंदोलक आणि पोलिसांत जोरदार धुमश्‍चक्री!

आंदोलकांवर प्रतिबंध लादण्यासंदर्भात गृह सचिवांनी दिलेला आदेश, प्रतिबंध लावण्याची कारणे, पर्यायी कमी निर्बंध तसेच कायदेशीर आढाव्याच्या प्रक्रियेचा खुलासा करण्याचे निर्देश संबंधितांना दिले जावेत, असे सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आले. डिजिटल संपर्क निलंबित करण्याच्या कार्यपालिकेच्या शक्तीवर ॲड. एन. के. गोस्वामी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Supreme Court Delhi barricades
CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी! 'सीजेपी'चे 11 ऑक्टोबरला पणजीत आंदोलन, अभिजीत दीपके राहणार अनुपस्‍थित

पोलिसांचेही म्हणणे ऐकणार

पोलिसी कारवाईच्या व्यापकतेबाबत जी चिंता व्यक्त केली आहे, त्याची जाणीव असल्याचे न्यायालयाने सांगितले. ‘प्रतिवादींचे काय म्हणणे आहे तेही ऐकून घ्यावे लागेल. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांकडे सरकारच्या दृष्टीकोनाशिवाय दुसरा वेगळा कायदा नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. अनेक वकिलांना कित्येक तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले तर काहींना मारहाण करण्यात आली. वकिलांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देखील देण्यात आल्याचे ॲड. संजय हेगडे यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ashutosh Ranka CJP press conference
Supreme Court Delhi restrictions
Gyanesh Kumar Resignation
Abhijeet Dipke Detained Delhi Airport
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com