MK Stalin: "हिंदीचे गुलाम बनणार नाही", गृहमंत्री शाह यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा आक्षेप

MK Stalin: गृहमंत्री शाह यांनी हिंदी राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्याबाबत वक्तव्य केले होते, त्यावर सीएम स्टॅलिन यांचे हे वक्तव्य आले असून त्यांनी शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
MK Stalin
MK StalinDainik Gomantak
Published on
Updated on

Tamil Nadu CM MK Stalin On Hindi Language And Amit Shah: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधत "आम्ही हिंदीचे गुलाम बनणार नाही", असे म्हटले आहे.

गृहमंत्री शाह यांनी हिंदी राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्याबाबत वक्तव्य केले होते, त्यावर स्टॅलिन यांचे हे वक्तव्य आले असून त्यांनी शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

गृहमंत्री शहा काय म्हणाले

शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे संसदेच्या राजभाषा समितीच्या ३८व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत शाह म्हणाले की, हिंदी भाषा स्वीकारण्याचा वेग मंद असला तरी विरोध न करता हिंदीला स्वीकारले पाहिजे.

यासोबतच गृहमंत्री शाह म्हणाले की, हिंदीची इतर भाषांशी स्पर्धा नाही आणि सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देऊनच देश सक्षम होईल.

MK Stalin
Watch Video: गांजा तस्करीत पोलिसांच्या सहभागाचा आरोप; संतप्त जमावाने पेटवले पोलीस ठाणे

सीएम स्टॅलिन यांनी आक्षेप घेतला

"केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी भाषा स्वीकृतीच्या विधानाचा मी तीव्र निषेध करतो. अहिंदी भाषिकांना वश करण्याचा हा प्रयत्न आहे. तमिळनाडूने हिंदी वर्चस्व नाकारले आणि कोणत्याही प्रकारचे लादले. आमची भाषा आणि वारशाचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही हिंदीचे गुलाम होणार नाही."

असे ट्विट तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राजभाषा समितीच्या ३८व्या बैठकीनंतर केले.

MK Stalin
Justice Rohit Dev: कोर्ट सुरू असतानाच राजीनामा देणारे हाय कोर्टाचे न्यायाधीश, रोहित देव यांचे गोवा कनेक्शन माहित आहे का ?

"मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी कर्नाटक आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये हिंदी लादण्यास विरोध गृहमंत्री शाह यांच्या निदर्शनास आणून दिला. ते म्हणाले की, कर्नाटक, पश्चिम बंगाल सारखी अनेक राज्येही हिंदी लादण्यास तीव्र विरोध करत आहेत.

ते म्हणाले की, गृहमंत्री शाह महोदय कृपया वाढत्या विरोधाकडे लक्ष द्या आणि 1965 च्या हिंदी विरोधी आंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटवणे हे मूर्खपणाचे पाऊल असेल असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com