Weather Update: येत्या काही दिवसात 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण भारतातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे.
Rain 

Rain 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

देशातील काही राज्यांमध्ये हिमवृष्टी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण भारतातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे.

<div class="paragraphs"><p>Rain&nbsp;</p></div>
सावधान! ओमिक्रॉनच्या नावावर होऊ शकते तुमची फसवणूक

पुढील 24 तासांत तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये (Chennai) अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने येथील नागरिकही चिंतेत आहेत.

हवामानाचा अभ्यास करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या म्हणण्यानुसार, पश्चिम हिमालयीन भागात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामान बदलत आहे. हे 3 जानेवारीपर्यंत सुरू राहील. परिणामी मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडच्या वरच्या भागात हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 4 ते 7 जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 5 ते 7 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>Rain&nbsp;</p></div>
पालकांनो सावधान! हा निष्काळजीपणा ठरू शकतो आपल्या मुलांसाठी घातक

दिल्लीत तापमानात घट
दिल्लीत 3 जानेवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान 2-4 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. दिल्लीत 7 जानेवारीपर्यंत थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com