आई-वडील आपल्या मुलांची काळजी घेत असले तरी थोडासाही निष्काळजीपणा त्यांना महागात पडू शकतो. कारण एक नाही तर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे पालकांच्या निष्काळजीपणामुळे मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुजरातमधील सुरत शहरातून ताजे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुरतमध्ये छतावर पतंग उडवताना सहा वर्षांचा मुलगा खाली पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती आई-वडील व इतर नातेवाइकांना समजताच त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.
घाईघाईने जवळच्या रुग्णालयात दाखल केले
मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय तनय पटेल हा पहिल्या वर्गात शिकत होता. गुरुवारी तनयने त्याच्याच पाच मजली निवासी इमारतीच्या छतावर चढून पतंग उडवण्यास सुरुवात केली. यादरम्यान तनय पतंग उडवण्यात एवढा मग्न झाला की त्याचे पाठीमागे लक्षच राहिले नाही आणि त्याचा पाय घसरला आणि तनय जमिनीवर कोसळला. यावेळी तेथे उपस्थित लोकांना या घटनेची माहिची मिळताच त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. तनयला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात तनय पालकांची नजर चूकवून मुलांसह खेळण्यासाठी इमारतीच्या छतावर पोहोचल्याचे समोर आले आहे.
अनेक मोठे अपघात होतात
गुजरातमध्ये दरवर्षी पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात खेळला जातो लहान मोठे पतंग उडवण्यात मग्न होवून जातात. मात्र यावेळी अनेकांचा बळी जातो आणि अनेकजण गंभीर जखमीही होतात. यासोबतच पतंगाच्या मांजामुळे अनेक मोठे अपघातही घडतात. मांजामुळे अनेक जण जखमी होतात, तर अनेक ठिकाणी मांजा हाय टेंशन वायरमध्ये अडकल्याने मोठा बिघाड होतो. तनयच्या कुटुंबात आई-वडील आणि मोठी बहीण आहे. तिचे वडील हिरेन पटेल हे नवसारी कृषी विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत. तर आई गृहिणी आहे. या कुटूंबाला तनयच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. तेव्हा आपलेही मुलं नजर चूकवून खेळायला जात असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.