Pakistani Cosmetic Creams: तुम्हीही गोरेपणासाठी 'ही' क्रीम वापरताय का? 2 पाकिस्तानी सौंदर्य उत्पादनांवर मोठी कारवाई; भारतीय ग्राहकांची होतेय फसवणूक

CDSCO Warning Pakistani Cosmetic Creams: गोऱ्या आणि चमकदार त्वचेच्या मोहात पडून आजकाल अनेकजण कोणत्याही कॉस्मेटिक प्रॉडक्टचा विचार न करता वापर करतात, मात्र हीच सवय आता अत्यंत जीवघेणी ठरु शकते.
CDSCO Warning Pakistani Cosmetic Creams
Pakistani Cosmetic CreamsDainik Gomantak
Published on
Updated on

CDSCO Warning Pakistani Cosmetic Creams: गोऱ्या आणि चमकदार त्वचेच्या मोहात पडून आजकाल अनेकजण कोणत्याही कॉस्मेटिक प्रॉडक्टचा विचार न करता वापर करतात, मात्र हीच सवय आता अत्यंत जीवघेणी ठरु शकते. भारताची औषध नियामक संस्था 'सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन' ने थेट पाकिस्तानात तयार होणाऱ्या दोन प्रसिद्ध कॉस्मेटिक क्रीमबाबत अत्यंत गंभीर इशारा जारी केला. 'गोरी ब्यूटी क्रीम' आणि 'चांदनी व्हाईटनिंग क्रीम' अशी या घातक पाकिस्तानी कॉस्मेटिक्सची नावे असून केंद्र सरकारने स्पष्ट केले की, या उत्पादनांचा वापर मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आणि असुरक्षित आहे.

सीडीएससीओने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, या दोन्ही पाकिस्तानी क्रीम्सना भारतात आयात करण्यासाठी किंवा विकण्यासाठी कोणत्याही सरकारी प्राधिकरणाकडून कोणतेही नोंदणी प्रमाणपत्र जारी केलेले नाही. ही उत्पादने बेकायदेशीर मार्गाने भारतीय बाजारात दाखल झाली आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सरकारी तपासणीदरम्यान या क्रीम्समध्ये शिशासारख्या अत्यंत विषारी आणि घातक धातूंचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त आढळले आहे.

CDSCO Warning Pakistani Cosmetic Creams
Pakistan Honor Killing: पाकिस्तानात कुप्रथेचा भयानक नंगानाच! 'कारो-कारी'च्या नावाखाली 470 महिलांची हत्या; 12 कोटी महिलांच्या अस्तित्वावर टांगती तलवार

या क्रीम्सच्या सततच्या वापरामुळे त्वचेचा कर्करोग, ॲलर्जी आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांचे गंभीर नुकसान होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. लाहोरमधील कंपन्यांद्वारे बनवल्या जाणाऱ्या या क्रीम्समुळे ग्राहकांमध्ये टॉक्सिक इन्फेक्शन पसरत आहे.

CDSCO Warning Pakistani Cosmetic Creams
Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

या प्रकरणी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया राजीव रघुवंशी यांनी सर्व राज्यांच्या औषध नियामक संस्था आणि कस्टम्स पोर्ट प्राधिकरणांना या बेकायदेशीर उत्पादनांवर कडक पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, बाजारात बंदी असूनही अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो आणि टाटा 1एमजी सारख्या मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हे प्रॉडक्ट्स सर्रास विकले जात असल्याचे उघडकीस आल्याने ऑनलाइन कंपन्यांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या वेबसाइट्सवर या पाकिस्तानी क्रीम्सना 'मेड इन इंडिया' असा खोटा लेबल लावून ग्राहकांची उघडपणे फसवणूक केली जात होती.

CDSCO Warning Pakistani Cosmetic Creams
Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

अद्यापही काही ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर नाव बदलून किंवा विक्रेत्यांची माहिती लपवून या क्रीम्सची विक्री सुरु आहे. त्यामुळे सरकारने अशा बेकायदेशीर आणि विषारी कॉस्मेटिक्सची खरेदी न करण्याचे आणि ऑनलाईन व्यासपीठांनी अशा उत्पादनांवर त्वरित पूर्ण बंदी घालण्याचे कडक आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com