Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमक्या, कार्यालयात दाऊदच्या नावाने फोन...

तीन वेळा फोन, खंडणीची मागणी
Nitin Gadkari
Nitin Gadkari Dainik Gomantak

Nitin Gadkari: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरींच्या नागपुरातील कार्यालयात दोन वेळा फोन करून धमकावण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11.30 ते 12.30 च्या दरम्यान हे धमकीचे फोन आले होते. विषेश म्हणजे, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेत हे धमकीचे फोन आल्याचे समजते.

Nitin Gadkari
Bharat Jodo Yatra: राहुल गांधीची भारत जोडो यात्रा स्थगित, कारण...

शनिवारी (14 जानेवारी) 11:30 ते 12:30 च्या दरम्यान गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाला दोन धमकीचे फोन आले. फोनवरून दाऊदचे नाव घेत खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास केंद्रीय मंत्री गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तीन वेळा फोन आल्यानंतर गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गडकरी यांच्या कार्यालयात भेट देत तपास सुरू केला. या धमकीच्या फोननंतर गडकरींच्या कार्यालय आणि निवासस्थानाभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Nitin Gadkari
Central Government: अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू

नितीन गडकरी यांना धमकीचा फोन कर्नाटकातील हुबळी येथून करण्यात आला होता. ज्या फोन नंबरवरून कॉल आला होता तो नंबर पोलिसांना देण्यात आलेला आहे. नितीन गडकरी यांचा समावेश मोदी सरकारमधील अत्यंत कार्यक्षम मंत्र्यांमध्ये होतो. चांगले काम चांगला रिझल्ट देणारे मंत्री म्हणून गडकरींची ओळख आहे. नितीन गडकरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. ट्विटर आणि फेसबुकसह त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील आहे. यु ट्युबवरून त्यांची कमाईदेखील होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com