Cyber Fraud: टीप मिळाली अन् आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश झाला! 1000 कोटींच्या सायबर घोटाळ्याचं 'चीन कनेक्शन'; 4 चिनी नागरिकांसह 17 जणांवर गुन्हा दाखल

CBI Cyber Fraud Chargesheet: केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने 1000 कोटीहून अधिक रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपत्र दाखल केले.
Cyber Fraud
Cyber FraudDainik Gomantak
Published on
Updated on

Cyber Fraud Racket: केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने 1000 कोटीहून अधिक रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपत्र दाखल केले. यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली चार चिनी नागरिकांसह एकूण 17 व्यक्ती आणि 58 कंपन्यांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. रविवारी (14 डिसेंबर) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यावर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी हे एक संघटित सिंडिकेट असल्याचे सिद्ध केले. हे सिंडिकेट जटिल डिजिटल आणि आर्थिक प्रणालींचा वापर करुन अनेक प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे करत होते.

टोळीच्या फसवणुकीची पद्धत

या आंतरराष्ट्रीय टोळीने अनेक मार्गांनी सामान्य लोकांना आणि गुंतवणूकदारांना लक्ष्य केले. यात दिशाभूल करणारे लोन अर्ज, बनावट गुंतवणूक (Investment) योजना, पॉन्झी आणि मल्टी-लेव्हल मार्केटिंग मॉडेल्सचा समावेश होता. बनावट पार्ट-टाईम नोकरीच्या ऑफर देऊन किंवा फसव्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही लोकांकडून पैसे उकळले जात होते.

Cyber Fraud
Cyber Fraud: सारवी, कविता, दिनाज, जास्मिन... चौघींच्या प्रेमात 80 वर्षीय मुंबईकर कंगाल, 9 कोटींना घातला गंडा

तपास यंत्रणेच्या अंतिम अहवालानुसार, या टोळीने 111 शेल कंपन्यांमार्फत अवैध निधीचे व्यवहार लपवले. त्यांनी 'म्यूल' खात्यांचा वापर करुन सुमारे 1000 कोटी रुपयांची हेराफेरी केली. या 'म्यूल' खात्यांपैकी एका खात्यात खूप कमी कालावधीत 152 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली होती, असे अहवालात नमूद करण्यात आले.

कोविड महामारीच्या काळात सुरुवात

सीबीआयने माहिती दिली की, या शेल कंपन्या 'डमी' (डमी/बनावट) संचालक, बनावट किंवा दिशाभूल करणारी कागदपत्रे, खोटे पत्ते आणि व्यावसायिक उद्देशांबद्दल खोटी शपथपत्रे वापरुन तयार करण्यात आल्या होत्या. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या सायबर फ्रॉड सिंडिकेटने 2020 मध्ये फसवणूक सुरु केली होती. विशेष म्हणजे, याच काळात संपूर्ण देश कोविड-19 महामारीच्या संकटाशी झुंजत होता. या कठीण परिस्थितीत लोकांच्या गरजा आणि कमकुवतता यांचा फायदा घेऊन त्यांनी हे रॅकेट चालवले.

आरोपपत्रात म्हटले की, या शेल कंपन्या चार चिनी ऑपरेटर, झोउ यी (Zhou Yi), हुआन लियू (Huan Liu), वेइजियान लियू (Weijian Liu) आणि गुआनहुआ वांग (Guanhua Wang) यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आल्या होत्या.

Cyber Fraud
Goa Cyber Fraud: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश: गोमंतकीयाकडून उकळले 2.63 कोटी; गुजरातमधील आरोपी गजाआड

मनी लॉन्ड्रिंगसाठी ओळखपत्रांचा वापर

या चिनी ऑपरेटरच्या भारतीय साथीदारांनी अज्ञात आणि निष्पाप लोकांकडून त्यांची ओळखपत्रे मिळवली. या कागदपत्रांचा उपयोग शेल कंपन्यांचे मोठे जाळे आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी (Money Laundering) तयार केलेल्या खात्यांचे नेटवर्क उभे करण्यासाठी करण्यात आला. या खात्यांचा वापर फसवणुकीतून मिळालेले पैसे लॉन्डर करण्यासाठी आणि पैशांच्या व्यवहाराचे मूळ ठिकाण लपवण्यासाठी केला जात होता.

Cyber Fraud
Cyber Fraud: गोमंतकीय व्यक्तीला 4.70 लाख रुपयांचा घातला गंडा; पंजाबच्या सराईत सायबर चोरट्याला अटक

या संपूर्ण तपासात कम्युनिकेशन लिंक्स आणि ऑपरेशनल कंट्रोलचा मागोवा घेण्यात आला. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, यामुळे परदेशातून हे फ्रॉड नेटवर्क चालवणाऱ्या चिनी मास्टरमाईंड्सची भूमिका पूर्णपणे सिद्ध झाली. सीबीआयने आता या 17 आरोपी आणि 58 कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून, या आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com