India Russia: भारताच्या पंतप्रधानांना घाबरवण्याची किंवा धमकवण्याची कल्पनाही करू शकत नाही: पुतीन

India Russia Relations: रशियाशी भारताची जवळीक सोव्हिएत युनियनच्या काळापासून मजबूत आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीही नेहरूंची वैचारिक जवळीक सोव्हिएत युनियनशी होती.
India Russia Relations|PM Modi| Putin
India Russia Relations|PM Modi| PutinDainik Gomantak

Can't imagine intimidating or threatening Indian PM Narendra Modi, Putin:

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान, पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की त्यांचे धोरण भारत आणि रशियामधील संबंध अधिक दृढ करण्याची हमी आहे.

पुतीन म्हणाले की, "रशिया आणि भारत यांच्यातील संबंध प्रत्येक प्रकारे दृढ होत आहेत आणि याला पंतप्रधान मोदींचे धोरण कारणीभूत आहे. मी कल्पनाही करू शकत नाही की मोदींना धमकावले जाऊ शकते किंवा भारताच्या हिताच्या विरोधात कोणताही निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकते."

"मला माहित आहे की, त्यांच्यावर असा दबाव आहे. मात्र, यावेळी आम्ही त्याच्याशी बोललोही नाही. मी फक्त बाहेरून गोष्टी पाहतोय. खरे सांगायचे तर, भारत आणि भारतीय लोकांचे हित जपण्यासाठी मोदींची कठोर भूमिका पाहून मला कधी कधी धक्का बसतो," असे पुतिन पुढे म्हणाले.

या वर्षी जूनमध्ये एका कार्यक्रमात पुतिन यांनी मोदी सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेचे कौतुकही केले होते. त्यांनी पीएम मोदी हे चांगले मित्र असल्याचेही सांगितले.

पुतिन म्हणाले, नरेंद्र मोदी हे रशियाचे जवळचे मित्र आहेत. मोदींनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडिया योजना लागू केली होती. या योजनेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला. आपणही मेक इन इंडियाचे पालन केले तर त्यात काही गैर नाही. जरी ही आमची योजना नसून आमच्या मित्राची आहे.

India Russia Relations|PM Modi| Putin
चीनी मालाला भारतीयांनी धुडकावले, वर्षभरात 45 टक्के ग्राहकांनी खरेदी केले नाही एकही Chinese Product

रशियाशी भारताची जवळीक सोव्हिएत युनियनच्या काळापासून मजबूत आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीही नेहरूंची वैचारिक जवळीक सोव्हिएत युनियनशी होती.

स्वातंत्र्यानंतर भारत आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. पण ही मैत्री अधिक घट्ट झाली जेव्हा 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. या युद्धकाळात सोव्हिएत युनियनने भारताला पाठिंबा दिला होता. त्यावेळी अमेरिकेने फक्त पाकिस्तानला पाठिंबा दिला होता.

India Russia Relations|PM Modi| Putin
Air Pollution In India: वायू प्रदूषणात भारत चीनच्या पुढे, तर ड्रॅगनने 'असे' मिळवले प्रदूषणावर नियंत्रण

1971 च्या युद्धाच्या काही महिन्यांपूर्वी भारत आणि सोव्हिएत युनियनमध्ये एक महत्त्वाचा करार झाला होता. यामध्ये सोव्हिएत युनियनने युद्ध झाल्यास भारताला केवळ मुत्सद्दीच नव्हे तर शस्त्रास्त्रांच्या आघाडीवरही पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते.

एवढेच नाही तर 1999 मध्ये भारताने अणुचाचणी केली तेव्हा अमेरिकेने त्याला विरोध केला होता. अमेरिकेने भारतावर अनेक प्रकारचे निर्बंधही लादले होते. पण रशियाने असे काही केले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com